पारोळा, जि.जळगाव : येथील एनइएस गर्ल्स विद्यालयात कला महोत्सवाला सुरुवात झाली. यात मेहंदी स्पर्धा, चित्रकला, क्रीडा, रांगोळी, फॅन्सी ड्रेस या स्पर्धांसह फनी गेम, आनंद मेळावा तसेच शारदोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाने कला महोत्सवाची सांगता झाली.या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या कलागुणांच्या प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. विद्यार्थिनींनी स्नेहसंमेलनाचा रंगतदार कार्यक्रम सादर केला.प्रास्ताविक शारदोत्सव समितीप्रमुख सचिन पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक अशोक वाणी होते. प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक रोहन मोरे, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे होते.दहावीच्या विद्यार्थिनी दिशा पाटील, हेमर्षी महाले, हर्षदा पाटील, नेहा साळी, जिज्ञासा पाटील यांनी ईशस्तवन सादर केले. मान्यवरांनी विविध उपक्रमांचे कौतुक केले.उद्घाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी मुख्याध्यापिका नंदिनी मोराणकर, पर्यवेक्षक दिलीप भावसार, प्राचार्य प्रदीप सोनजे, अभय पाटील, राकेश शिंदे, संजय पाटील, योगेश पाटील, विशाल महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.शारदोत्सवात महाराष्ट्रीयन संस्कृती दर्शन, भारतातील विविध राज्यातील संस्कृतीचें दर्शन, विविध प्रकारचे नृत्य प्रकार, लावणी, गरबा, देशभक्तीपर नृत्य, पारंपरिक नृत्य, आधुनिक नृत्य, वेस्टर्न डान्स, कॉमेडी डान्स, नाटिका, एकपात्री नाटिका, रिमिक्स, लेक वाचवा, राष्ट्रीय एकात्मता, समाज प्रबोधन, स्वच्छ भारत अभियान, नारी शक्ती या विविधांंगी परफॉर्मन्सचा समावेश होता.
पारोळा येथे एनइएस विद्यालयात कला महोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 3:11 PM
एनइएस गर्ल्स विद्यालयात कला महोत्सवाला सुरुवात झाली.
ठळक मुद्देविद्यार्थिनींच्या कलागुणांनी जिंकली उपस्थितांची मनेमान्यवरांनी केले विविध उपक्रमांचे कौतुक