जळगाव : राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे़ दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बांधितांची संख्या ही वाढत चालली आहे. बुधवारी एका दिवसात तब्बल १३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ३९, बोदवड १९, भुसावळ, यावल प्रत्येकी १३, चोपडा ११, रावेर १०, अमळनेर ०७, जळगाव ग्रामीण ०६, भडगाव, पारोळा प्रत्येकी ०५, एरंडोल, जामनेर प्रत्येकी ०३, पाचोरा, धरणगाव, चाळीसगाव, मुक्ताईनगर प्रत्येकी ०१ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३ हजार ७२० इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.८८ जणांना मिळाला डिस्चार्जजिल्ह्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे बरे होण्याच्या प्रमाणातही समाधारकारक आहे. बुधवारी ८८ जणांनी कोरोनावर मात करून डिस्जार्च मिळविला. यात जळगाव शहरातील २९, यावल १७, एरंडोल ११, जळगाव ग्रामीण १०, बोदवड ०७, जामनेर ०४, भुसावळ, अमळनेर, चोपडा, धरणगाव प्रत्येकी ०२, रावेर पारोळा प्रत्येकी ०१ कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे़ आतापर्यंत २ हजार १९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.सहा जणांचा मृत्यूदरम्यान, बुधवारी कोरोनामुळे जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यात अमळनेर, धरणगा येथील प्रत्येकी ०२ तर रावेर आणि मुक्ताईनगर प्रत्येकी ०१ रूग्णाचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे २५० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे़ तसेच १ हजार २७१ कोरोना बाधित रूग्ण उपचार घेत आहेत.
नवीन १३८ कोरोना बाधित रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 7:48 PM