शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

शिक्कामोर्तब! येत्या सत्रापासून पदवी, पदव्युत्तरसाठी नवीन शैक्षणिक धोरण 

By अमित महाबळ | Published: March 01, 2023 2:31 PM

राज्य सरकारला करणार शिफारस, राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

अमित महाबळ

जळगाव : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून बी.ए. / बी.कॉम. / बी.एस्सी. या तीन पदवी तसेच एम.ए./एम.कॉम./एम.एस्सी. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्यावर राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अंमलबजावणीपूर्वी पुढील तीन महिन्यात उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांमध्ये बैठका घेऊन जनजागृती करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती गठीत केलेली असून, समितीची बैठक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पार पडली. यावेळी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे प्र-कुलगुरू व अधिष्ठातांसमवेत समितीने संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मंगळवारी सुकाणू समितीची बैठक झाली. डॉ. नितीन करमळकर, कबचौ उमवि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्राचार्य अनिल राव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्रा.आर. डी. कुलकर्णी, नाशिक येथील उद्योजक महेश दाबके, अमरावती येथील डॉ. प्रशांत मगर, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, मुंबई येथील डॉ. माधव वेलिंग, डॉ. जोशी, जळगाव विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण उपस्थित होते.

जाणून घ्या ठळक मुद्दे

- पहिल्या टप्प्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी. या पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी हे धोरण लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्याचे ठरले.

- चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम हा ऑनर्स आणि रिसर्च असा राहणार आहे. तीन वर्षाच्या पदवीसाठी कमीत कमी १२० आणि जास्तीत जास्त १३२ क्रेडीट निश्चित करण्यात आले तर चार वर्षाच्या पदवीसाठी कमीत कमी १६० आणि जास्तीत जास्त १७६ क्रेडीट निश्चित करण्यात आले आहेत.

मधूनच बाहेर निघणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी...

- पदवीसाठी शिकत असतांना एक वर्षानंतर विद्यार्थी बाहेर पडला तर त्याला एक वर्षाचे प्रमाणपत्र दिले जाईल मात्र ४० ते ४४ क्रेडीट आणि कौशल्यावर आधारीत ६ क्रेडीट आणि अधिकचे ४ क्रेडीट बंधनकारक राहतील.

- पदवी शिकतांना दोन वर्षानंतर जर विद्यार्थी बाहेर पडला तर त्याला पदविका प्रमाणपत्र दिले जाईल. मात्र त्यासाठी ८० ते ८८ क्रेडीट, कौशल्यावर आधारीत ६ क्रेडीट व अधिकचे ४ क्रेडीट पूर्ण करावे लागतील.

संशोधन केंद्र असेल तरच परवानगी

चार वर्षीय रिसर्च पदवी अभ्यासक्रम हा ज्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये संशोधन केंद्र आहेत त्याच ठिकाणी सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. ज्या विषयात विद्यार्थी पदवी घेणार आहे. त्या विषयाचे क्रेडीट त्याच विद्यापीठ अथवा विद्यापीठाच्या परिक्षेत्राातील महाविद्यालयांमधून पूर्ण करावयाचे आहे. इलेक्टीव्ह क्रेडीट मात्र इतर विद्यापीठ अथवा महाविद्यालयांमधून पूर्ण करता येईल.

पदव्युत्तरसाठी हा पेपर बंधनकारक

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी क्रेडीट निश्चित करण्यात आले आहे. पदव्युत्तरच्या दुसऱ्या वर्षात संशोधन पद्धतीचा थेअरी पेपर आणि इंटर्नशिप बंधनकारक राहील. पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकतांना विद्यार्थी पहिल्या वर्षी बाहेर पडला तर त्या विषयाचे ४० ते ४४ क्रेडीट पूर्ण करावे लागतील. अतिरिक्त क्रेडीटची गरज भासणार नाही.

तांत्रिक शिक्षणाचाही समावेश करणार

विद्यापीठातील शैक्षणिक विभाग, स्वायत्त महाविद्यालये आणि संलग्नित महाविद्यालयांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये हे नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची शिफारस शासनाकडे केली जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मुक्त विद्यापीठ, कौशल्य विद्यापीठ, संस्कृत विद्यापीठ यांच्याकडे असलेल्या कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमाचे क्रेडीट प्राप्त करण्यासाठी या विद्यापीठांसोबत संवाद साधला जाणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणात तांत्रिक शिक्षणाचाही विचार केला जावा यासाठीही उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.

 

टॅग्स :JalgaonजळगावEducationशिक्षणGovernmentसरकारcollegeमहाविद्यालय