भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे काम चिखली ते तरसोद सुरू असून यातील सर्वात मोठा वाघुर नदीवरचा पूल २५ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच जुन्या जीर्ण अवस्थेतीला पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामार्ग कामास तीन -चार महिन्यापासून ब्रेक लागला होता. पावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणारा पूल मजूर टंचाईमुळे व तांत्रिक अडचणींमुळे तब्बल तीन महिना उशिराने पूल सुरू करण्यात आला आहे. वास्तविक हा पूल एप्रिल महिन्यातच सुरू होणार होता. यानंतर ९ जून रोजी सुरू करणार असल्याचे महामार्ग अधिकाऱ्यांनी सांगितले होते, पूलाचे काम जवळपास ७ महिने करुन पूल वाहतुकीस खुला करणार आला.अशी आहे पुलाची रचना१९३ मिटरची लांबी असणाºया २७.५ मीटरचे ७ गाळे असलेल्या या पुलाची रुंदी १२.५ मीटर आह. तसेच उंची नदी पात्रापासून पुलाच्या मध्यभागी पर्यंत सुमारे २० मीटरची आहे. पुलावर पावसाचे पाणी थांबू नये याकरिता सुमारे एक फुटाची ढलान काढण्यात आलेली आहे. याशिवाय पादचाऱ्यांसाठी दीड मीटरचा फूटपाथ तयार करण्यात आला आहे.अशी झाली ऐतिहासिक पुलाची निर्मितीपुलाच्या निर्मितीसाठी एकूण सात महिन्याचा कालावधी लागला. यातील तीन महिने लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये काम बंद ठेवण्यात आले होते. पुलास ८०० टन आसारी वापरण्यात आली. यात १६ ते ३२ एमएम असाºयांचा वापर करण्यात आला, काँक्रीट मिश्रित ७ हजार ५०० एम क्यूब माल पुलासाठी लागला. तर यासाठी सुमारे ६१ हजार सिमेंटच्या बॅेग लागल्या. पुढील शंभर वर्षापर्यंत पुल मजबुतीने उभा राहील अशा पद्धतीने पुलाची डिझाईन करण्यात आली आहे. यासाठी तब्बल ३०० मजुरांनी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. पुलाची विशेषता म्हणजे पीएससी गर्डर टेक्नॉलॉजीचा वापर करून पुलाची निर्मिती करण्यात आली आहे . तब्बल २८ पीएससी गर्डर पुल निर्माण करण्यासाठी लागले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुलावर दोन्ही बाजूला एक मीटरसुरक्षा कठडयांची उभारणी करण्यात आली असून रात्रीच्या वेळेस लांबूनच पुलाचा अंदाज यावा याकरिता कठड्यावर रंगरंगोटी करण्यात आलेली आहे.मजबुतीसाठी सपोर्टिंग वॉलभुसावळ ते जळगावच्या बाजूने पुलास लागून असलेल्या रस्त्याला मातीचा मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आलेला आहे, पावसात माती पाहून जाऊ नये याकरिता मातीवर दगडी स्वरूपातच्या सपोर्टिंग वॉल तयार करण्यात आली आहे.अपघाताचे प्रमाण होणार कमीजुन्या पुलावर मोठ्यव प्रमाणात खड्डे पडले होते तसेच सुरक्षा कठडे तुटले होत.े यामुळे पुलावर नेहमीच अपघात घडणे नित्याची बाब झाली होती. ९ जून रोजी भुसावळचा तरुण मोबाईल व्यवसायिक कठडे नसल्याने सरळ पुलावरून खाली पडून ठार होता.उद्घाटनाची वाट न पाहता पूल झाला खुलागेल्या दोन-तीन दिवसापासून पुलाचे यशस्वी परीक्षण झाल्यानंतर पुलाचे उद्घाटन धुमधडाक्यात होईल असे वाटत असताना पुलावर कोणतेही फित न कापता लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकाºयांना न बोलवता सरळ पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.२५ जूनची होणार ऐतिहासिक नोंदमहामार्गावरच्या सर्वात मोठ्या व १०० वर्ष मजबूत स्थितीत उभारलेला पूल २५ जून रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे याची इतिहासात नोंद होणार आहे.
वाघुर नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी अखेर खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 5:45 PM