- विजयकुमार सैतवालजळगाव - अमेरिकेमधील बँका एकामागून एक डबघाईला जात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढतच असून शनिवार, १८ मार्च रोजी तर सोने व चांदीत एकाच दिवसात प्रत्येकी एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने थेट ५९ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. सोन्याचा आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव ठरला आहे. चांदीदेखील ६८ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.
अमेरिकेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बँकिंग क्षेत्र ढवळून निघाले असून त्यामुळे एकामागून एक बँका बंद पडत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढू लागली असून परिणामी त्यांचे भाव वाढत आहे. गेल्या आठवड्यापासून हा परिणाम अधिकच होत असल्याने आठ दिवसात सोने तीन हजार ८०० रुपये तर चांदी सहा हजार ३०० रुपयांनी वधारली आहे.
१० मार्च रोजी सोने ५६ हजार रुपयांवर होते. ते आता शनिवार, १८ मार्च रोजी थेट ५९ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. चांदीदेखील १० मार्च रोजी ६२ हजार ३०० रुपयांवर होती. तीदेखील शनिवार, १८ मार्च रोजी ६८ हजार ८०० प्रति किलोवर पोहचली आहे.
सुवर्ण बाजार नवीन उच्चांकीवरसोन्यातील १८ मार्च रोजीच्या दरवाढीमुळे दरानेदेखील नवीन उच्चांक गाठला असून ते ६० हजार रुपयांच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. यापूर्वी ७ ऑगस्ट २०२० रोजी ते ५७ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. त्यानंतर २६ जानेवारी २०२३ रोजी ५७ हजार ९५० रुपये, १ फेब्रुवारी रोजी ५८ हजार १५० रुपये, २ फेब्रुवारी रोजी ५९ हजार १५० रुपये प्रति तोळ्यावर सोने पोहचले होते. त्यानंतर आता तर १८ मार्च रोजी तर ते थेट ५९ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर सोने पोहचले आहे. सोन्याचे हे भाव आजपर्यंतचे सर्वाधिक ठरले आहे.
कॅरेटनिहाय सोन्याचे भाव२४ कॅरेट – ५९,८००२२ कॅरेट – ५४,७८०१८ कॅरेट – ४४,८५०
अमेरिकेमध्ये बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडत असल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढत आहेत. त्याचा परिणाम भारतातही होत आहे. - प्रफुल्ल सुराणा, सुवर्ण व्यावसायिक, जळगाव.