शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

वरणगावात नवीन एलईडीचा करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 3:46 PM

पालिकेचे अडीच कोटी रुपये वाचणार

वरणगाव, जि.जळगाव : ५० हजार लोकसंख्या असलेल्या वरणगाव शहरात नवीन एलईडी दिवे बसविण्यासाठी करार करण्यात आला असून, याद्वारे पालिकेचे वर्षाला अडीच कोटी रुपये वीज बिलापोटी वाचणार आहेत.जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मंत्रालयात वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे व नगरसेविका मेहनाजबी इरफान पिंजारी, इईसीएलचे राज्याचे व्यास्थापकीय संचालक दीपक कोकाटे, उपसंचालक अमित चोपडे, समाजसेवक इरफान पिंजारी, कार्यालय अधीक्षक गंभीर कोळी, कुंदन माळी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून इइएसएल या कंपनीसोबत संपूर्ण शहरामध्ये १५०० वीज खांब व १५० एलइडी लाईट बसवण्याचा महत्वपूर्ण करार करण्यात आला. एकूण एलईडचा करार ६६ लाख ६० हजार ८२२ रुपयेप्रमाणे एकूण सात वर्षासाठीचा करार असणार आहे. प्रत्येक वर्षी ९ लाख रुपये वीज बिल भरावे लागणार आहे व सात वर्ष ईइएसएल कंपनी देखभाल दरूस्ती करणार आहे.वरणगाव पालिकेला महिन्याला साडेतीन ते चार लाख वीजेचे बिल भरावे लागल होते तर वर्षाला वीज बिलापोटी ५० लाखाचा बोजा पडत होता. आता नवीन एलईडीचा कराराने वर्षाला फक्त नऊ लाखाप्रमाणे सात वर्षाला ६६ लाख ६० हजार रुपये वीज बिल नगरपालिकेला भरावे लागणार आहे. या नवीन करारामुळे वरणगाव नगरपालिकेचे दोन कोटी ३९ लाख ४० हजार रुपये वाचणार आह. कामाला तत्काळ सुरूवात करून दजेर्दार एलईडी लाईट वरणगाव शहरात बसवण्याचे आदेश याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्तिथ राज्याचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कोकाटे व अधिकाऱ्यांना दिले. नवीन एलईडी लाईटमुळे संपूर्ण वरणगाव आता प्रकाशमय होणार असून, एक विकासाची मुहूर्तमेढ रोवली असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ