बी.एस. चौधरीएरंडोल - येथील भारती दीपक सपकाळे यांनी घराच्या अठरा विश्वे दारिद्राशी लढा देत स्वत:च्या हाती स्कूल बसचे स्टेरिंग घेतले. त्या रोज स्कूल बस चालवून विद्यार्थ्यांना शाळेत नेतात व सुखरूप घरापर्यंत पोहोचवितात.गेल्या नऊ वषार्पासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या ने - आण करून आगळा वेगळा आनंद घेतात. त्या जास्त शिक्षण घेऊ शकल्या नाहीत पण त्यांच्या वाहनात जाणारे चिमुकले खूप शिकावीत व उच्च पदापर्यंत पोहोचावी अशी त्यांची भावना आहे .
एरंडोल येथे वाहन चालकाचे काम स्वीकारत ठेवला नवा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:49 AM