आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.८,जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारपासून या हंगामातील उडीद, मुगाच्या खरेदीस प्रारंभ होत असून लिलावाद्वारे खरेदी करण्यात येणार आहे. शेतकºयांचा माल विक्री झाल्यानंतर तत्काळ रक्कम शेतकºयांना दिली जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
शेतकºयांसमोरच होणार लिलावबाजार समितीत शेतमाल विक्री केल्यानंतर शेतकºयांना मालाची रक्कम घेण्यासाठी अनेक फेºया माराव्या लागतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त होतात. ही समस्या दूर करण्यासाठी तत्काळ पैसे अदा करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. लिलाव प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी शेतकºयांसमोरच लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्यावर्षी शेतकरी संघटनांकडून बाजार समिती प्रशासनाकडे ही मागणी करण्यात आली होती.
इन्फो-उडीद ५ हजार तर मुगाचे दर ५ हजार ५०० रुपयांपर्यंतसध्या बाजार समितीत नवीन हंगामातील मुग, उडीदची खरेदी नाही. जुन्याच मालाची सध्या खरेदी होत असून उडीदाचे दर प्रतिक्विंटल ५ हजार तर मुगाचे दर ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत असल्याची माहिती सभापती प्रकाश नारखेडे यांनी दिली. सोमवारपासून नवीन हंगामातील मालाची खरेदी सुरु होत आहे. लिलावात भाव ठरविला जाणार असल्याचे नारखेडे यांनी सांगितले.
उत्पन्नात वाढ होण्याचा अंदाजयंदा जिल्ह्यात पावसाची टक्केवारी गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असली तरी पिकांना आवश्यक पाऊस जिल्ह्यात झाला आहे. मुग,उडीदाच्या पिकांचे फार काही नुकसान झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात यंदा मुग,उडीदाच्या उत्पन्नात वाढ होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात काही शेतकºयांनी मूग काढणी केली आहे तर उडीदाची काढणी सध्या सुरु आहे.