लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : परिचर यांची कनिष्ठ साहाय्यक पदावर तर कनिष्ठ साहाय्यकांची वरिष्ठ साहाय्यक पदावर पदोन्नती करण्याची प्रक्रिया काही काळ रखडली होती. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने अशा ३९ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत त्यांना नववर्षाचे गिफ्ट दिले आहे. यात २५ परिचारक यांना कनिष्ठ साहाय्यक पदावर पदोन्नती मिळाली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या पदोन्नत्या करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, ते रखडले हाेते. अखेर २५ परिचारक आणि १४ कनिष्ठ साहाय्यकांना पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. परिचर - कनिष्ठ साहाय्यक झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दीपक गिरमरकर, रमाकांत खैरनार, सय्यद सादीक, गोकूळ महाजन, रश्मी गायकवाड, नितीन विसपुते, प्रवीण आखाडे, उज्ज्वला देशमुख, हेमंत पाटील, विश्वनाथ सावकारे, अ. रज्जाक देशपांडे, दिनेश पाटील, रघुनाथ पाटील, संजय जवरे, राजेंद्र देशमुख, नीता ताडे, शोभा नेरकर, महेश वाणी, रत्नमाला चौधरी, संध्या नाईक, विद्या चौधरी, रत्ना वंजारी, वैशाली आव्हाड, प्रशांत होले, चुडामण घुले यांचा समावेश आहे.
तर कनिष्ठ - वरिष्ठ साहाय्यकांमध्ये राजेश तागवाले, दिनशे लोखंडे, सुरेश बागडे, सतीश पाटील, रवींद्र सोनवणे, सरला चौधरी, जितेंद्र देशमुख, ज्योती भोसले, प्रतिभा पाटील, अरविंद पाटील, हिंमत ठाकरे, राजेंद्र पाटील, संध्या तायडे यांचा समावेश आहे.