जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत गर्भवती महिलांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी आता आरोग्य विभागाने थेट घरोघरी जाऊन समुपदेशन करण्यावर भर दिला आहे. त्याच्या पहिल्याच दिवशी यंत्रणेला चांगला प्रतिसाद मिळाला. १६८ महिलांना लस देण्यात आली.
पहिल्या दिवशी केवळ ८९ महिलांनी लस घेतल्याने दुसऱ्या दिवशी ९ पथकांनी घरोघरी जाऊन समुपदेशन केले. यात विविध भागांमध्ये गर्भवती महिलांना लस देण्यात आली. यात प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, चेतनदास मेहता रुग्णालयात बुधवारीही सामन्य १८ वर्षांपुढील वयोगटांसाठी पहिला व दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा उपलब्ध राहणार आहे. यात पहिला डोस हा पूर्णत: ऑनलाइन व दुसरा डोस हा ५० टक्के ऑनलाइन व ५० टक्के ऑफलाइन राहणार आहे.
नवीपेठ २१
शिवाजीनगर ३३३
सुभाष चौक २२
जुनेगाव ११
इंडिया गॅरेज ७
तांबापुरा ११
गावठाण ९
सुप्रीम कॉलनी २२
हरीविठ्ठलनगर २२