जळगाव : सोने-चांदीच्या भावात घसरण सुरूच असून सलग दुसºया दिवशीही चांदीचे भाव ८०० रुपये प्रती किलोने घसरून ४९ हजार ३०० रुपयांवरून ४८ हजार ५०० रुपयांवर आले. यासोबतच सोन्याचेही भाव १०० रुपये प्रती तोळ््याने घसरून ३८ हजार ६०० रुपयांवरून ३८ हजार ५०० रुपये प्रती तोळ््यावर आले.गेल्या चार महिन्यांपासून वेगवेगळ््या कारणांनी सोने-चांदीचे भाव वाढत जाऊन उच्चांकीवर पोहचले. या उच्चांकी भावामुळे सोने-चांदी खरेदीऐवजी मोडकडे कल वाढत असल्याने या धातूंचे भाव कमी होऊ लागले. त्यामुळे ६ सप्टेंबर रोजी एकाच दिवसात सोन्याचे भाव ९०० रुपये प्रती तोळ््याने कमी ते ३८ हजार ६०० रुपयांवर तर चांदीचे भाव ७०० रुपये प्रती किलोने कमी होऊन ४९ हजार ३०० रुपयांवर आले आहेत. त्यांनतर सलग दुसºया दिवशी ७ रोजीदेखील या भावात आणखी घसरण झाली. त्यात ७ रोजी भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचेही भाव कमी होऊन ते ७१.६८ रुपयांवरून ७१.६५ रुपयांवर आले. या सर्व कारणांमुळे ७ रोजी चांदीचे भाव ८०० रुपये प्रती किलोने घसरून ४९ हजार ३०० रुपयांवरून ४८ हजार ५०० रुपयांवर आले. या सोबतच सोन्याचेही भाव १०० रुपये प्रती तोळ््याने घसरून ३८ हजार ६०० रुपयांवरून ३८ हजार ५०० रुपये प्रती तोळ््यावर आले.सोने-चांदीची खरेदी होण्याऐवजी मोडकडे कल वाढत असल्याने मागणी कमी होत आहे. परिणामी सोने-चांदीच्या भावात सलग दुसºयाही घसरण झाली.- किशोर सुराणा, सुवर्ण व्यावसायिक.
सलग दुसऱ्या दिवशी चांदी गडगडली, ८०० रुपयांनी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 12:11 PM