अमळनेर, जि.जळगाव : शेततळ्यात महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळणारे नगाव बुद्रूक गाव पावसाअभावी तहानलेले होते. मात्र नुकत्याच झालेल्या पावसाने चिखली नदी भरून वाहू लागल्याने नगाव खुर्द पाठोपाठ आता नगाव बुद्रूक या गावातही आबादानी झाली आहे.सुमारे ८० शेततळे, नाले खोलीकरण, चिखली नदी खोलीकरण अशी अनेक कामे होऊनही नगाव बुद्रूक गावात पाऊस नसल्याने शेततळे रिकामे तर पाणीटंचाई ही जाणवत होती. वर्षभर टँकर सुरू होते. मात्र यंदा समाधानकारक पाऊस झाला. परिसरातील लोकांनी आनंद व्यक्त केला. नगाव बुद्रूकचे महेश पाटील, उपसरपंच विजय पाटील, बापू कोळी, ग्राम पंचायत सदस्य दिनेश पाटील, शरद पाटील, देवा, अशोक पाटील, नाना नाईक, ईश्वर पाटील, नाना पाटील, सुरेश पारधी, उत्तम व गावातील नागरिकांनी चिखली नदीची पूजा करून आरती केली.तहानलेल्या नगाव बुद्रूक या गावात चिखली नदी भरून वाहू लागल्याने ग्रामस्थांनी जल्लोष केला. यापुढे जलसंधारणाच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्याचा संकल्पही ग्रामस्थांनी केला आहे.
नगाव खुर्द पाठोपाठ आता नगाव बुद्रूकही झाले ‘पाणीदार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 1:27 AM