ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 3 - मोठा गाजावाजा करीत श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 योजनेंतर्गत दिवाळीपूर्वी शेतक:यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले, मात्र अजूनही पात्र शेतक:यांच्या यादीबाबत गोंधळ कायम असल्याचे चित्र आहे. याद्या कशा भरल्या जाव्यात, यासाठी आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जळगावात गुरुवारी गटसचिवांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर लाखो शेतक:यांच्या याद्यांमधील सर्व त्रुटी दूर करण्याचे काम सुरु झाले. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेर्पयत सर्व सुधारीत याद्या सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातून 2 लाख 46 हजार 53 जणांचे (कुटुंब व्याख्येनुसार) कजर्माफीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले होते. यासाठी एकूण 876 याद्या अपलोड करण्यात आल्या. त्या अपलोड करण्यापूर्वी गटसचिवांकडून अर्जातील 1 ते 66 कॉलम भरून घेण्यात आले. यामध्ये संबंधित कॉलमची माहिती नसल्यास तेथे शून्य भरण्यात आला. याच प्रकारे जन्मतारीख, पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक व इतर माहिती भरण्यात आली.
प्रक्रियेनंतर जागगटसचिवांनी ही माहिती सीडीमध्ये सहकार विभागाकडे सादर केली. त्यानंतर ती आयटी तज्ज्ञांनी अपलोड केली. संपूर्ण माहिती अपलोड झाली, चार रंगाच्या याद्या तयार झाल्या, प्रातिनिधीक स्वरुपात 30 शेतक:यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र उर्वरित शेतक:यांची प्रतीक्षा दिवाळीच्या 15 दिवसांनंतरही संपलेली नाही. ही प्रक्रिया झाल्यानंतर आता गटसचिवांना प्रशिक्षणांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या कॉलममध्ये शून्य भरायचा सांगितला होता, तेथे ‘एनए’ (नॉट अव्हेलेबल) असा उल्लेख असायला हवा होता, असे सांगण्यात येऊन वेगवेगळ्य़ा कॉलममध्ये काय असावे या बाबत गटसचिवांना माहिती भरण्यास सांगितले जात आहे.
उशिरा आली जागअर्ज भरताना त्यात काय अपेक्षित आहे, या बाबत अर्ज भरण्यापूर्वी गटसचिवांना प्रशिक्षण दिले गेले नाही. केवळ अर्ज भरण्याची घाई करण्यात आली. यात गटसचिवांनी अर्ज भरून ते जवळपास महिन्यापूर्वीच सादर केले. एवढा काळ गेला आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण देण्यासाठी सहकार विभागास एवढय़ा उशिरा जाग आली का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
गणेश कॉलनीत सर्व लवाजमागटससचिवांना प्रशिक्षण देण्याची सोय गणेश कॉलनीतील जिल्हा बँकेच्या शाखेच्यावर करण्यात आली असून तेथे जिल्हाभरातील सर्व गटसचिवांना बोलविण्यात आले आहे. येथे प्रत्येक तालुक्यासाठी एक असे 15 संगणक संच बसविण्यात आले असून आयटी तज्ज्ञ प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्यासह तालुका उपनिबंधक, विशेष लेखापरीक्षक, जिल्हा बँकांचा अधिकारी हजर होते. संपूर्ण सभागृहात गाद्या अच्छादीत करण्यात आल्या असून प्रशिक्षणाची जोरदार लगबग सुरू आहे.
अडीच लाख शेतक-यांचे अर्ज दोन दिवसात पूर्ण करण्याचा आटापिटाजिल्हाभरातील 2 लाख 46 हजार 53 (कुटुंब व्याख्येनुसार) शेतक:यांच्या अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशिक्षण देणे व त्रुटी दूर करणे दोन दिवसात शक्य आहे का, यापूर्वी मोठा काळ हाती असताना त्रुटी राहिल्या, दोन दिवसातील घाईघाईत आणखी त्रुटी राहू शकणार नाही का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
रात्रीचा दिवसशुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेर्पयत याद्यांमधील त्रुटी दूर करून त्या सादर करायच्या आहे. त्यानंतर त्या स्वीकारल्या जाणार नसल्याने हे काम पूर्ण करण्यासाठी गुरुवारी रात्रीही कामकाज सुरू होते. यामुळे अनेक गटसचिवांनी घरी संपर्क साधून रात्री घरी येणार नसल्याचे कळविले.