हा अनुभव ७ जुलै रोजी सकाळी २ वाजून २६ मिनिटांनी अजिंठा ते सिल्लोड या दरम्यान एका साधारण हॉटेलमध्ये बसून लिहीला आहे़ पुणे येथे ७ जुलैला महत्त्वाच्या कामासाठी जाणे गरजेचे होते. रेल्वेत जागा नसल्याने रेडबस वर वातानुकूलित शिवशाही स्लिपर बसचे ८०५ रूपये क्रेडीट कार्ड वरून भरून तिकीट काढले. रात्री साडेनऊ वाजता बस जळगाव येथून निघाली ़ साडे अकरा वाजता हॉटेलला पोहोचली. चालक व वाहक यांचे. जेवण आटोपल्यानंतर स्पार्कींग झाले व बस सुरु झालीच नाही. फोनाफोनी सुरु झाली. वाहकाने केलेल्या खुलाशांनी मी हादरलो. चालक हा परिवहन कर्मचारी नव्हता, बसचे इंडिकेटर दोन दिवसांपासून बंद होते व प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू होता बस धुळे येथील कोण्या मालकांची होती व राज्य परिवहन त्यांचा शिक्का मारून चालवत होती़ आता मात्र तळ पायाची आग मस्ताकापर्यंत पोहोचली होती. दीड वाजता जळगावहून पर्यायी पण नॉन स्लिपर बस निघाली असे वाहकाने सांगितले. किमान दोन तास बसला पोहोचायला लागणार होते.फर्दापूर येथील डॉक्टर मित्राला फोन केला व भाड्याचे वाहन पाठवण्याची विनंती केली. तिकिटाचे पैसे मागितल्यावर कार्यालयातूनच रिफंड मिळतील असे वाहकाने सांगितले़ वाहकाकडून फोन नंबर घेवून राज्य परिवहन जळगाव येथील अधिकाऱ्यांशी बोललो व तक्रार केली. कार पोहोचली पण चुकीचा निरोप गेल्याने जळगावला सोडावयास. मी कार चालकास परत पुणे जाण्याची विनंती केली अडचणीत रात्री उठून आल्याने १०० रु देवू केले परंतु गृहस्थांनी ५०० रूपयांची मागणी केली़ मी निमूटपणे पैसे दिलेत़ नशिबाला दोष देण्यापलिकडे मी काहीच करू शकत नव्हतो़-डॉ़ विलास भोळे, एमडी स्त्रीरोगतज्ज्ञ
जळगाव-पुणे रस्त्यावरील ती रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:30 PM