जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात निखिल राजू पाटील याची नायब तहसिलदार या राजपत्रित अधिकारी पदावर निवड झाली आहे. क्रीडा प्रवर्गातून राज्यात प्रथम येत संपूर्ण निकालातील सर्वात कमी वयाचा अधिकारी ठरला आहे़निखिल हा मुळचा रावेर तालुक्यातील गहुखेडे येथील रहिवासी आहे़ हल्ली तो शहरातील टागोर नगरात वास्तव्यास आहे़ आऱआऱ महाविद्यालयात इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण मू़जे़ महाविद्यालयात घेतले आहे़ नंतर पदवीचे शिक्षण पुणे येथे पूर्ण केल्यानंतर तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत होता़ तर आता निखिल याची नायब तहसिलदारपदी निवड झाली आहे़ तो एसटी वर्कशॉपमध्ये हेड मेकॅनिक राजेंद्र पाटील यांचा पुत्र आहे.
निखिल पाटील यांची नायब तहसिलदारपदी निवड ; क्रीडा प्रवर्गातून राज्यात प्रथमजळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात निखिल राजू पाटील याची नायब तहसिलदार या राजपत्रित अधिकारी पदावर निवड झाली आहे़ क्रीडा प्रवर्गातून राज्यात प्रथम येत संपूर्ण निकालातील सर्वात कमी वयाचा अधिकारी ठरला आहे़निखिल हा मुळचा रावेर तालुक्यातील गहुखेडे येथील रहिवासी आहे़ हल्ली तो शहरातील टागोर नगरात वास्तव्यास आहे़ आऱआऱ महाविद्यालयात इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण मू़जे़ महाविद्यालयात घेतले आहे़ नंतर पदवीचे शिक्षण पुणे येथे पूर्ण केल्यानंतर तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत होता़ तर आता निखिल याची नायब तहसिलदारपदी निवड झाली आहे़ तो एसटी वर्कशॉपमध्ये हेड मेकॅनिक राजेंद्र पाटील यांचा पुत्र आहे़