जळगाव : जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड चाचणी परीक्षा शनिवारी (दि.२९) सकाळी घेण्यात येणार आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यात ३० केंद्रे आहेत. यामध्ये जळगाव शहरातील तीन केंद्रांचा समावेश आहे. साडेनऊ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी सकाळी ११ : ३० ते दुपारी १ : ३० या वेळेत प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यात ३० केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. ९ हजार ८५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना दोन तासात १०० गुणांसाठी ८० प्रश्न सोडवायचे आहेत. मेंटल ॲबिलिटी ४० प्रश्न : ५० गुण, ॲरिथमॅटिक २० प्रश्न : २५ गुण आणि भाषा २० प्रश्न : २५ गुण याप्रमाणे प्रश्नपत्रिकेची विभागणी आहे. परीक्षा सलग होणार असून, मध्ये सुटी नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी अतिरिक्त ४० मिनिटे दिली जाणार आहेत. परीक्षा केंद्रात सकाळी ११ वाजेपर्यंत प्रवेश मिळेल. सव्वाअकरा ते साडेअकरा सूचना वाचन केले जाईल. त्यानंतर परीक्षेला सुरूवात होईल.
परीक्षा केंद्रे याप्रमाणे
जळगाव शहर : ए. टी. झांबरे विद्यालय, ला. ना. शाळा, नंदिनीबाई शाळा, चोपडा : पंकज महाविद्यालय, विवेकानंद विद्यालय, यावल : सद्गुरु हायस्कूल, रावेर : सरदार जी. जी. हायस्कूल, अग्रवाल कन्या शाळा, मुक्ताईनगर : जे. ई. हायस्कूल, खडसे सेमी इंग्लिश स्कूल, भुसावळ : के नारखेडे विद्यालय, ताप्ती इंग्लिश मीडियम स्कूल, जामनेर : न्यू इंग्लिश स्कूल, इंदिरा ललवाणी हायस्कूल, एकलव्य प्राथमिक शाळा, पाचोरा : जी. एस. हायस्कूल, एन. एम. कॉलेज, चाळीसगाव : राष्ट्रीय विद्यालय, ए. बी. बॉईज हायस्कूल, पूर्णपात्रे विद्यालय, भडगाव : सुमनताई गिरधर माध्यमिक विद्यालय, लाडकूबाई माध्यमिक विद्यालय, पारोळा : एन.ई.एस. बॉइज हायस्कूल, डॉ. व्ही. एम. जैन विद्यालय, एरंडोल : आर. टी. कांबरे हायस्कूल, जिजामाता माध्यमिक विद्यालय, अमळनेर : जी. एस. हायस्कूल, साने गुरुजी विद्यालय, बोदवड : एन. एच. राका हायस्कूल, धरणगाव : इंदिरा गांधी विद्यालय.