`यावल : मागील भांडणाच्या कारणावरून बुधवारी रात्री तालुक्यातील आडगाव येथे दोन गटात झालेल्या जोरदार हाणामारीत दोन्ही गटाकडील महिलेसह ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. परस्परांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटांकडील ज्ञात-अज्ञात अशा ८९ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, गावात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षकांची भेटआडगाव येथे दंगलीची घटना घडल्याचे समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले,अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी भेट देवून पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधला. पोलिसांच्या माहितीनुसार यावल तालुक्यातील आडगाव येथे ५ जून रोजी गिरीश शशिकांत शिंदे व वसीम सुपडू तडवी आणि इतरांविरुद्ध गिरीश याचे काका दीपक सुनील शिंदे यांनी तक्रार दिली होती, ती का दिली या कारणावरून बुधवारी रात्री संशयित आरोपी संजू तडवी, जावेद रज्जाक तडवी, जुम्मा तडवी, सुभान तडवी, सुना तडवी, शरीफ तडवी, रमजान तडवी, आरीफ तडवी, जावेद समशेर तडवी, सुपडू तडवी, वसीम तडवी, मुकद्दर तडवी, सिकंदर तडवी, अकील जुम्मा तडवी, सादिक तडवी, अकील सुभान तडवी, हकीम तडवी, जहागीर तडवी, राजू तडवी, गुलशेर तडवी, रा. आडगाव व सौखेडासीम येथील असलम तडवी यांच्यासह अनोळखी २५ -३० जणांनी लाठ्या-काठ्या,दगड घेऊन गिरीश याचे काका शशिकांत शिंदे, व रवींद्र शिंदे यांच्या घरात घुसून महिलेचा विनयभंग करीत गळ्यातील सुमारे २२ ग्रॅ्रम सोन्याचे दागीने ओढून नेले.पाच जण जखमीघरांवर व वाहनावर दगडफेक केली. यात दीपक शिंदे, सोनू पाटील, गिरीश पाटील, महेश कोळी, महेश रघुनाथ पाटील, असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, तर विरोधी गटाच्या अमीना रमजान तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चंद्रकांत पाटील, आशाबाई पाटील, सुधीर पाटील, गोकुळ पाटील, सतीश पाटील, सुनील पाटील, दीपक पाटील, अमोल उर्फ वकील भगवान पाटील, गुणवंत बेंडाळे, नितीन पाटील, शामकांत पाटील, सुनील पाटील, भुरेखा महाराज, पवन शिंदे, समाधान पाटील, विशाल वाणी, मनोहर पाटील, नीलेश पाटील यांच्यासह अनोळखी १०-१५ जण संजू गोबा पाटील यास मारहाण करीत असताना फिर्यादी महिला त्यास सोडविण्यास गेली असता तिला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.महिलेसह चार जखमीगावात कसे राहता अशी धमकी देत लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून वस्तीवर (घरांवर) दगडफेक केली. यात फिर्यादी महिलेसह सुभान तडवी, अकील तडवी, अरमान तडवी यांना दुखापत करून जखमी केले आहे. उघडू तडवी यांच्या पानटपरीचे नुकसान केले आहे. अशा आशयाच्या फिर्यादीवरून संशयित आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आडगावात हाणामारी, ९ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 2:41 PM