लोकमत न्यूज नेटवर्कपाचोरा : सीबीएसई नवी दिल्लीमार्फत घेण्यात येणाºया आंतरशालेय राज्यस्तर कबड्डी स्पर्धेत यजमान निर्मल इंटरनॅशनल स्कूलने विजयी सलामी दिली आहे. निर्मल स्कूलने १९ वर्षे आतील मुलींच्या गटात ठाणे येथील जिंदाल विद्या मंदिराचा ४९-१८ गुणांनी पराभव केला.या स्पर्धेचे उद््घाटन आमदार किशोर पाटील, माजी आमदार आर.ओ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.बाबासाहेब उलपे, संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी, नरेंद्र सिंह सूर्यवंशी, प्राचार्य डॉ.भगवान सावंत उपस्थित होते. स्पर्धेत दहा सामने झाले.१९ वर्षे गटात विजय मिळवल्यानंतर १७ वर्षे मुलींच्या गटात मात्र निर्मल स्कूलला पराभव पत्करावा लागला. परभणीच्या स्कॉटिश अकॅडमीने विजय मिळवला. १७ वर्षे आतील मुलांच्या गटात सेंट्रल कंट्री, नागपूरने स्कूल आॅफ स्कॉलर, मलकापूरवर दणदणीत विजय मिळवला. भिवंडीच्या आॅलसेंट्स स्कूलने पुण्याच्या इंदिरा स्कूलचा ५० - १३ असा पराभव केला.इतर निकाल पुढीलप्रमाणे१७ वर्षे - मुले - आरएमडी पुणे वि.वि. दत्तकला शिक्षण संस्था ५५-३४, व्यंकटेश्वर पब्लिक स्कूल, सांगली वि.वि.पोदार इंटरनॅशनल, अहमदनगर ६२-३६. १९ वर्षे मुले- शांतीनिकेतन, कोल्हापूर वि.वि. अरविंद स्कूल नागपूर ५१-१८. निर्मल स्कूल पाचोरा वि.वि. दत्तकला संस्था, दौंड ५२-४२.विद्या प्रतिष्ठान वि.वि. इंदिरा स्कूल ४९-२०.जिंदाल विद्या मंदिर वि.वि. दत्तकला संस्था २६-२०.
निर्मल स्कूलची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:54 AM
लोकमत न्यूज नेटवर्कपाचोरा : सीबीएसई नवी दिल्लीमार्फत घेण्यात येणाºया आंतरशालेय राज्यस्तर कबड्डी स्पर्धेत यजमान निर्मल इंटरनॅशनल स्कूलने विजयी सलामी दिली आहे. निर्मल स्कूलने १९ वर्षे आतील मुलींच्या गटात ठाणे येथील जिंदाल विद्या मंदिराचा ४९-१८ गुणांनी पराभव केला.या स्पर्धेचे उद््घाटन आमदार किशोर पाटील, माजी आमदार आर.ओ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ...
ठळक मुद्देभिवंडीच्या आॅलसेंट्स स्कूलने पुण्याच्या इंदिरा स्कूलचा ५० - १३ असा पराभव केला.थाटात उद््घाटन झाल्यानंतर पावसाच्या व्यत्ययाने काही वेळ हे सामने थांबवण्यात आले होते.निर्मल स्कूलने १९ वर्षे आतील मुलींच्या गटात ठाणे येथील जिंदाल विद्या मंदिराचा ४९-१८ गुणांनी पराभव केला.