नशिराबाद : गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी नशिराबाद पोलिसांनी हद्दीतील उपद्रवी व वादग्रस्त असलेल्या 120 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यासर्वाना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नशिराबादच्या 13 तर भादलीच्या 22 जणांना गावात बंदी घालण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी ‘लोकमत’ दिली. कलम 107 अन्वये 81 जणांवर प्रतिबंधात्मक तर कलम 110 अन्वये चार सराईत गुन्हेगारांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. कारवाई केलेल्यांव्यतिरिक्त गुन्हेगार व उपद्रवी लोकांवर पोलिसांची करडी नजर आहे. गुन्हेगार दत्तक योजनेंतर्गत गुन्हे शोध पथकाच्या कर्मचा:यांवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.