स्टार डमी :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एकूण महिलांपैकी दहा टक्के महिलांनी रुग्णालयात येण्यापूर्वी कोणतीही तपासणी केली नाही. मात्र, रुग्णालयात आल्यानंतर त्यांची तपासणी केली जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रुग्णालय पूर्णत: कोविड करण्यात आले होते. त्यानंतर ऑक्टोबरच्या सुमारास जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्याने डिसेंबरपासून पुन्हा नॉन कोविड यंत्रणा सुरळीत सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारीत रुग्णसंख्या वाढू लागल्याने मार्चच्या सुमारास पुन्हा पूर्ण रुग्णालय कोविड करण्यात आले आहे. कोविडची बाहेर भीती असल्याने अनेक महिला या कोणतीही तपासणी न करता थेट प्रसूतीसाठी या रुग्णालयात येत आहेत. मात्र, कोविडच्या काळात या रुग्णालयात सामान्य प्रसूती बंद होत्या. केवळ कोविड बाधित महिलांच्या प्रसूती या रुग्णालयात होत होत्या. मध्यंतरी गर्भवती बाधित होण्याचे प्रमाण अधिक वाढले होते. सध्या हे प्रमाण घटले आहे.
वर्षभरात झालेल्या प्रसूती : १,१६१
किती टक्के महिलांनी आधी तपासणी केली नाही : १० टक्के
किती बालकांना व्यंग : १०
तपासणी आवश्यकच
स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार गर्भधारणेनंतर रक्ताच्या तपासण्या आवश्यकच असतात. यात कम्प्लिट ब्लड काऊंट, हिमोग्लोबीन, रक्तगट आदी तपासण्या आवश्यक असतात, यासह एचआयव्ही व कावीळ यांचीही तपासणी करून घ्यावी, यासह वीस आठवड्यानंतर सोनोग्राफी केल्यास बाळाचे व्यंग असल्यास ते समजते.
कोट
महिलांनी पुढील धोके टाळण्यासाठी प्रसूती आधी या तपासण्या करून घेणे अत्यावश्यकच असते. यात रक्ताच्या तपासण्या आवश्यक असून यात रक्तातील विविध घटकांचे प्रमाण समजून पुढील उपचार करणे सोयीचे होते.
- डॉ.संजय बनसोडे, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख