वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : पवित्र रमजान महिना शेवटच्या पर्वात असून सामान्य दिवसात रमजानच्या शेवटच्या पर्वाला समाज बांधवांकडून ईदची खरेदीसाठी मोठी लगबग सुरू असते, मात्र यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजबांधवांनी 'ईदची' खरेदी रद्द केली असून, या रकमेतून समाजबांधव गोरगरीब, हातावर पोट भरणाऱ्या लोकांची आर्थिक मदत करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.मुस्लीम समाज बांधवांचा सर्वात मोठा उत्साह म्हणजे 'रमजान ईद' यासाठी समाज बांधव वर्षभरापासून नियोजन करतात. तसेच रमजान महिन्यात शेवटच्या पर्वात ईदसाठी मोठी खरेदी केली जाते. यात नवीन कपडे, ड्रायफ्रूट, महिलांसाठी विविध पेहराव, लहान मुलांसाठी बुट, चप्पल, फॅन्सी ड्रेस खरेदी करून ईदची जय्यत तयारी करण्यात येते. घरांना रंगरंगोटी करण्यात येते. मात्र यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साकेगाव मुस्लीम समाज बांधवांतर्फे रमजान ईदला खरेदी न करता या रकमेतून गोरगरीब हातावरचे पोट भरणाºया मजुरांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. जेणेकरून या संकटसमयी ही प्रत्येक समाज बांधवांनी स्वत:ला हतबल न समजता या महामारीचा सामना सक्षमपणे करावा.अडीच टक्के जकातमधून होणार मदतरमजान महिन्यांमध्ये प्रत्येक समाज बांधवांकडे असलेल्या संपत्तीपैकी अडीच टक्के संपत्ती ही गोरगरिबांसाठी जकात अदा करावी लागते. यंदा खºया अर्थाने गोरगरिबांना या अडीच टक्के रकमेची मदत मिळणार असून, शासकीय मदत मिळो अथवा ना मिळो मात्र यामधून नक्कीच गोरगरिबांना काही प्रमाणात समस्या सुटण्यास मदत होईल.बाजारात कोणीही गर्दी करणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर तसेच सर्व प्रशासकीय नियमांचा अवलंब करत असून समाजबांधवांना शिस्तीने नियमांचे पालन करावे यासाठी प्रोत्साहित करून जनजागृती करणार असल्याचाही निर्णय सर्व समाज बांधवांनी एकमुखाने घेतला.
ईदची खरेदी नाही : साकेगावात मुस्लीम समाज बांधवांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 4:09 PM
यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजबांधवांनी 'ईदची' खरेदी रद्द केली आहे.
ठळक मुद्देसमाजभान पाळणारगोरगरीब, हातावरचे मजूर यांना करणार मदत