जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक व खासदार अमोल कोल्हे यांच्या जळगावसह अन्य ठिकाणी प्रचार सभा होती. त्यानुसार त्यांनी बोदवड व एरंडोल येथे सभा घेतली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टर क्रॉस मार्ग होऊ नये, यासाठी अमोल कोल्हे यांच्या हेलिकॉप्टरला लँडिंग व टेकऑफला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे चोपड्यासह अन्य ठिकाणच्या सभा रद्द करण्यात आल्या.त्यानंतर अमोल कोल्हे म्हणाले, मोदींची पुण्यात सभा असल्यानं मला परवानगी नाकारण्यात आली. पिंपरी, चिंचवडच्या सभा मोदी पुण्यात असल्यानं मला रद्द कराव्या लागल्या. देशाचे पंतप्रधान एका पक्षाच्या प्रचाराला येत असल्यानं त्या प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवण्यात येत आहे. इतर पक्षांना प्रचार करणं नाकारलं जातंय. हे कितपत लोकशाहीच्या तत्त्वांना आणि मूल्यांना धरून आहे, याविषयी खरंतर संभ्रम निर्माण झाल्याखेरीज राहत नाही.
मोदींच्या पुण्यातील सभेमुळे 'नो एंट्री'; अमोल कोल्हेंच्या सभा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 9:42 PM