कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने पुढील सहा महिने फुले मार्केट अतिक्रमणमुक्त ठेवण्याचा निर्धार केला आहे. गेल्या आठवड्यात याबाबत आयुक्त सतीश कुलकर्णी, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी फुले मार्केटची पाहणीदेखील केली होती. यावेळी फुले मार्केटमध्ये एकही हॉकर्सला व्यावसाय करू न देण्याबाबत कडक सुचना आयुक्तांनी उपायुक्त संतोष वाहुळे यांना केल्या होत्या. त्यानुसार वाहुळे यांनी फुले मार्केटमध्ये जोरदार कारवाई मोहीम सुरू केली आहे. फुले मार्केटमध्ये हॉकर्स बांधवांमुळेच ग्राहकांची गर्दी होत असल्यामुळे, एकाही हॉकर्सला व्यवसाय करू न देण्यासाठी सकाळपासूनच अतिक्रमण विभाग फुले मार्केटमध्ये तैनात ठेवण्यात येत आहे. तसेच पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात येत आहे. त्यामुळे फुले मार्केटमध्ये शनिवारी एकाही हॉकर्सने दुकाने थाटले नसल्याचे मनपा अतिक्रमण विभागातर्फे सांगण्यात आले.
दिवसभरात हॉकर्सचे एकही दुकाने थाटले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:13 AM