शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

भाव नाही तर कापूस नाही; ६५ टक्के जिनिंग बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 5:45 AM

६५ टक्के जिनिंग बंद, मागणी घटल्याने फटका, उत्पादकांमध्ये चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव / अमरावती / अकोला / छत्रपती संभाजीनगर : यंदाही कापसाला समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली आहे. त्यामुळे बाजारातील कापसाची आवक घटली आहे. याचा परिणाम व्यवसायावर होत असून, कापसाअभावी जिनिंग बंद पडत आहेत. कापूस पट्टा असलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील ८७२ पैकी तब्बल ५६९ म्हणजे ६५ टक्के जिनिंग बंद आहेत. सध्या २५३  जिनिंगवरच खरेदी सुरू आहे. 

खरेदी घटली२.५० लाखगाठींची खरेदी यंदा खान्देशात झाली. गेल्या वर्षीची खरेदी तीन लाखांवर होती. ७०,०००गाठींची खरेदी पश्चिम विदर्भात झाली, गत वर्षी दोन लाख होती. 

तज्ज्ञांकडून भाव न वाढण्याची चार कारणे सूत उद्योजकांकडे मोठ्या प्रमाणात साठा असल्याने सूतगिरण्यांमध्ये कापसाला मागणी नाही.निर्यातदार देशांमध्ये सुताची मागणी घटलेली आहे. भारताच्या सुताचे दर इतर निर्यातदार देश अमेरिका व ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहेत. त्यामुळे भारताच्या मालाला उठाव नाही.मुख्य आयातदार बांगलादेशची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे त्या देशातही अद्याप भारताकडून निर्यात सुरू झालेली नाही.

भाववाढीच्या अपेक्षेने शेतकरी माल विक्रीसाठी आणत नाहीत, तर जिनर्सलादेखील ७१०० ते ७२०० रु.चा भाव  परवडत नाही. त्यामुळे खान्देशातील अनेक जिनिंग बंद आहेत. -अनिल सोमाणी, खान्देश जिनिंगचे संचालक

कापसाची आवकच नसल्याने पश्चिम विदर्भात जिनिंग बंद पडत आहेत. ज्या सुरू आहेत, त्यादेखील पूर्णक्षमतेने सुरू नाहीत. -अनिल पनपालिया,  विदर्भ जिनिंग असोसिएशन

कापसाच्या बाजारपेठेवर  युद्धांचा परिणाम

गोपाल व्यासबोदवड (जि. जळगाव) : जगात सध्या दोन युद्ध सुरू आहेत. युक्रेन व रशिया, तर दुसरीकडे हमास  व इस्राईल. या दोन्ही युद्धांमुळे जागतिक व्यापार केंद्राने हात आखडता ठेवला  आहे. परिणामी दरवर्षी लाखोंच्या संख्येने चीन, बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशियासह जपान या देशांमध्ये निर्यात होणाऱ्या भारतीय कापसाला यंदा उठाव कमी आहे. देशात कापसाच्या दोन कोटी ९४ लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५ लाख गाठींचे उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तविली आहे. 

जिनिंगची चाके एका शिफ्टलाच चालत आहेत. याबाबत जागतिक कापूस संघटनेचे (महाकॉट)  सदस्य अरविंद जैन यांनी सांगितले की, आखाती देशात बोदवडच्या कापसाच्या गाठी निर्यात होतात; परंतु सध्या इस्रायल  व हमास युद्धामुळे निर्यातीवर तीस टक्के परिणाम झाला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावAmravatiअमरावतीcottonकापूस