लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर कोविड केअर सेंटरमध्ये
आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले जाणारे कीट हे जाड असल्याने कर्मचारी या कीटला
वैतागले आहेत. कोरोनाने नाही पण कीटने मरु, अशी भावनाच या कर्मचाऱ्यांची
झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात कोरोनाचा उद्रेक वाढला
आहे. उद्रेक वाढल्यानंतर आरोग्य कर्मचारी पीपीई कीटचा जास्त वापर करायला
लागले आहेत. मात्र, राज्य शासनाकडून पाठवण्यात आलेले हे पीपीई कीट जाड
आहेत. याआधी हिवाळा होता. तसेच मार्च महिन्याच्या सुरूवातीला तापमानदेखील कमी होते. त्यामुळे या जाड पीपीई कीटमध्ये कर्मचाऱ्यांना फारशी
अडचण जाणवत नव्हती. मात्र, आता पुन्हा एकदा तापमान वाढत आहे आणि या
कीटमध्ये कर्मचारी घामानेच भिजत आहेत. त्यामुळे हे कीट नकोच, अशी भावना
आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांची झाली आहे.
जीएमसीत पर्यायी कीटची मागणी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक गाऊनसारखा पीपीई कीट हा याला पर्याय
म्हणून वापरला जाणार आहे. त्यासाठी ऑर्डरदेखील देण्यात आली आहे.
आकडेवारी
एकूण बाधित
उपचार सुरू
बरे झालेले
कोरोनाचे एकूण बळी
१२० पीपीई कीट्सचा दररोज होतोय वापर
नव्या कीट्सबाबत तक्रारी
हे कीट खूप जाड आहेत. ते घालून काम करणे अगदीच अशक्य आहे. त्यामुळे
आम्हाला फार उकडते. इतका घाम येतो की, काम करणे अशक्य होते. - आरोग्य
कर्मचारी
हे कीट घातल्यावर काही मिनिटात मला खूप घाम येतो. त्यामुळे काम करणे
अडचणीचे होऊन बसते. घाम येत राहिल्यास आरोग्याच्या इतर तक्रारीदेखील
जाणवतात. - आरोग्य कर्मचारी
यंदा उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच हे कीट वापरल्याने घामोळ्याचा त्रास सुरू
झाला आहे. असे वाटते की, कोरोनापेक्षा या कीटचा जास्त त्रास होत आहे. -
आरोग्य कर्मचारी
जीएमसीचे अधिष्ठाता काय म्हणतात
गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने या जाड
पीपीई कीट्सचा कर्मचाऱ्यांना त्रास होतो. त्यात त्यांना भयंकर उकडते. तशा
तक्रारी आहेत. मात्र, गेल्या वर्षी उन्हाळ्यातदेखील अशाच तक्रारी आल्या
होत्या. त्यावर उपाय म्हणून गाऊनसारखे शिवलेले पीपीई कीट आम्ही मागवले
आहेत. - डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय