आनंद सुरवाडे ।जळगाव : कोरोनामुळे मजुरांच्या स्थलांतराचे अतिशय भयावह चित्र दररोज समोर येत आहे़ तानुल्ह्यांना कडेवर घेऊन, संसाराचे गाढोडे पाठीवर टाकून हे मजूर कुटुंब घराच्या दिशेने शेकडो किमी पायी प्रवास करीत आहे़ सिन्नर येथून मध्यप्रदेश जाण्यासाठी पायी निघालेले ३० मजूर, लहान मुले व महिला अजिंठा चौफुलीवर थांबलेले होते़ शुक्रवारी रात्री त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर भयावह वास्तव अधिकच तीव्रतेने समोर आले़ ‘हाताला काम नाही, खिशात दमडी नाही, घरी कसे पोहचू....’ असे मन हेलावणारे प्रश्न या मजुरांकडून उपस्थित केले जात असून या सर्वांना घराची ओढ लागली आहे.शहरातील महामागार्वर मोठ्या प्रमाणावर पायी, ट्रकने, सायकल, दुचाकीने घराकडे परत निघाले आहे. महामार्गावर अजिंठा चौफुलीवर हे मजूर रात्री आसरा घेत असल्याचे चित्र आहे़ या ठिकाणी येणाऱ्या-जाणाºया ट्रकही थांबून त्यातील मजूर वर्ग पाणी व जेवण घेत असल्याचे शुक्रवारी रात्री निदर्शनास आले़सिन्नर नाशिक येथून ५ मे रोजी हे मजूर निघाले होते़ सर्वांचे हातावर पोट. काम मिळाले तर भाकरी मिळेल, अशी त्यांची दैनंदिनी़ कोरोनामुळे काम गेले व भाकरीचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला़ अशा स्थितीत बाहेर भुकेने आपण व चिमुकल्यांना होणारा त्रास हा इतका असह्य झाला, की अखेर घराकडे पावले आपोआपच चालू लागली़ सर्वांना सोबत घेऊन हे तीस मजूर मध्यप्रदेशाच्या सतना जिल्ह्याकडे निघाले होते़ शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हे मजूर कुटुंब अजिंठा चौफुलीवर पोहचले होते़ कोणती ट्रक येईल व किमान पुढचा प्रवास तरी सुखकर होईल, या विचारात हे कुटुंबीय थांबून होते. वाटेत पोटभर भाकरी व पाणी मिळत असल्याने त्यांनी धन्यता मानली़काही वेळा मी स्वत: जावून अशा मजुरांची राहण्याची व्यवस्था करून दिलेली आहे़ त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून देण्यात येऊ शकते़ असे कुठे मजूर कुटुंबिय आढळून आल्यास संपर्क साधल्यास त्यांची व्यवस्था करण्यात येईल- दीपमाला चौरे, प्रांताधिकारीपर्यायच नव्हता काय करणाऱ, त्यामुळे सिन्नर येथून आम्ही लहान मुलांना घेऊन पायीच निघालो़ येथून पुढे काही मिळाले नाही तर येथूनही पायीच जावे लागेल़ वाटेत जेवण पाणी मिळत होते़-एक मजूर (नाव सांगण्यास भीती)
हाताला काम नाही, खिशात दमडी नाही, घरी कसे जाणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:43 PM