भुसावळ : येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये नॉनकोविड अर्थात इतर आजारांच्या रुग्णांची सोय करावी आणि ग्रामीण रुग्णायलयात कोविड रुग्णांची सोय करावी या मागणीला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. याबाबत भाजपच्या वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितू पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला यश आले आहे.येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. गेल्या आठवड्यापासून त्यांची संख्याही चार ते दहाच्या आतच आहे. ट्रामा केअर सेंटरची पूर्ण वास्तू फक्त कोरोना चाचणीसाठी वापरण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत दररोज फक्त ५ ते १५ असेच रुग्ण तपासणीसाठी येत आहेत.या रुग्णांसाठी संपूर्ण ट्रामा केअर सेंटरची इमारत अडकवणे संयुक्तिक नाही. ही तपासणीदेखील ग्रामीण रूग्णालयाही करता येण्यासारखी आहे. यामुळे जे इतर कोविड सोडून आजारी रुग्ण आहेत त्यांची यामुळे होणारी गैरसोय थाबेल. त्यांना ट्रामा केअर सेंटरमध्येच उपचार मिळतील आणि त्यांचा पुढे जाण्याचा शारीरिक त्रास आणि आर्थिक त्रास पण वाचेल. शिवाय आरोपी, जेलमधील कैदी यासाठी पोलिसांना शिरसोली रोडवरील रुग्णालयात जाण्याचा त्रास आणि वेळ वाचेल. मागणीला मान्यता दिल्याबद्दल डॉ.नितू पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत.
भुसावळ ट्रामा केअर सेंटरमध्ये नॉनकोविड रुग्णांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 4:24 PM
भाजपच्या वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितू पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला यश आले आहे.
ठळक मुद्देडॉ.नितू पाटील यांच्या प्रयत्नांना यशजिल्हा प्रशासनाचे मानले आभार