जळगाव : मित्रांसोबत दुचाकीने जात असताना रस्त्यात पतंगाच्या मांजाने तरुणाचे नाक व कानाचा काही भाग कापला गेल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता रामानंदनगर परिसरातील रुख्मिणीनगरात घडली. स्वपAील रवींद्र ढाके (वय 24, रा.रुख्मिणीनगर, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.रामानंदनगर परिसरात काही तरुण पतंग उडवत होते. त्यावेळी स्वपAील हा त्याच्या मित्रांसोबत दुचाकीने जात असताना पतंगाचा मांजा अचानक स्वपAीलच्या नाकावर व कानावर आला. या मांजामुळे नाक कापले जावून कानालाही इजा झाली. रक्तबंबाळ झाल्याने स्वपAीलला त्याच्या मित्रांनी जिल्हा रुग्णालयात आणले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मुलाची अवस्था पाहून आईला रडू कोसळले. दरम्यान, मांजाला बंदी असतानाही शहरात मांजाची विक्री होत असल्याचे या घटनेवरुन सिध्द झाले आहे. असा तयार करतात मांजाटय़ुबलाईटच्या काचेचा चुरा, डिंक, रंग, नायलॉनची दोरी आदींचे मिश्रण करून मांजा तयार केला जातो. त्यामुळे हा मांजा हाताने तुटत नाही. जोराने ताणल्यास इजा होते. मकर संक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिका:यांनी त्यावर बंदी घातली, मात्र त्याची अंमलबजावणी शहरात झाली नाही. पोलीस प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता एकच दिवस मांजा विक्रीवर बंदी होती, अशी माहिती मिळाली. जिल्हाधिका:यांच्या आदेशाचा संदर्भ असलेले जळगाव तहसीलदारांचे पत्र पोलीस प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यानुसार सर्व प्रभारी अधिका:यांना लेखी कळवून मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडविताना मांजा व नायलॉनच्या दोरीचा वापर करू नये याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. जिल्हाधिका:यांचे हे आदेश फक्त एका दिवसासाठीच होते. -डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षकपतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणा:या मांजामध्ये ‘शार्प’ नावाचे रसायन असते. मांजा वापरणे घातक असून तीक्ष्णपणामुळे गंभीर जखमा होतात. तसेच सलग हातात ठेवल्यासही हात कापला जातो. मांजाचा वापर करायलाच नको. -डॉ. दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधिकारी.
रुख्मिणीनगरात मांजाने कापले तरुणाचे नाक
By admin | Published: January 16, 2017 12:56 AM