जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर सत्तेची चाबी काँग्रेसकडे आहे. जिल्हा परिषदेमध्ये कुणाला पाठिंबा द्यावा याचे अधिकार जिल्हाध्यक्षांसह स्थानिक नेत्यांना दिले आहेत. मात्र भाजपासोबत जाण्याची परवानगी प्रदेशपातळीवर मिळणार नसल्याचे काँग्रेसचे पालक आमदार भाई जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.शासकीय विश्रामगृहावर रविवारी दुपारी ३ वाजता त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख, जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी उपस्थित होते.तडजोडींची चौकशी करण्यात येईलजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. निवडणुकीनंतर प्रदेशस्तरावर चिंतन करण्यात आले आहे. जर कुठे तडजोडी झाल्या असतील तर त्याची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.यापुढे आता आघाडीकरून लढणारमुंबई येथे झालेल्या बैठकीत आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुक न लढविता आघाडी करून लढण्याबाबत निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.जलसंपदा मंत्र्यांकडून यंत्रणेचा गैरवापर; न्यायालयात जाणारमहापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करीत उमेदवारांना पैशांचा पुरवठा केला आहे. मुंबईमध्ये सहा ठिकाणी पैसे पकडले गेले मात्र एकाही आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला नाही. अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या तक्रारी आहेत. याबाबत आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे काँग्रेसचे पालक आमदार भाई जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पराभव ही एकट्या जिल्हाध्यक्षांची जबाबदारी नाहीनिवडणुकीतील पराभव ही एकट्या जिल्हाध्यक्षांची जबाबदारी नाही तर ती माझ्यासकट सर्व पदाधिकाºयांची आहे. त्यामुळे कुण्या एका व्यक्तीला जबाबदार धरून संघटनेत बदल करण्यात येणार नाही. मात्र संघटनेत ज्या नियुक्त्या झालेल्या नाहीत त्या लवकर केल्या जातील असे ही भाई जगताप यांनी स्पष्ट केले.
भाजपासोबत जाण्याची परवानगी देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 1:13 AM