कृत्य पाहून आरोपीची आत्या हसली
दरम्यान, या प्रकारानंतर घराबाहेर थांबलेली रशीदची आत्या शबनुरबी ऊर्फ छबी शेख मुराद ही चारही मुलींवर हसायला लागली. दुसऱ्यादिवशी पीडितांनी आई, वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून रशीद व शबनुरबीविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार कलम ३५४ अ, ५०, ५०६ व लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचा कायदा कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडितांनी सांगितली आपबिती
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. तपासाधिकारी एस. एन. पाटील यांनी चारही पीडितांचा जबाब नोंदविला होता. खटल्यादरम्यान सहायक सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी चारही पीडितांची न्यायालयात साक्ष घेतली. त्यात त्यांनी आपल्यावर जो प्रसंग बेतला तो जसाचा तसा सांगितला. समाजातील अशी प्रवृत्ती ठेचण्याकरिता आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, असा जोरदार युक्तिवाद ॲड. काबरा यांनी केला. ९ जणांच्या साक्षी व पुराव्यावरून न्यायालयाने रशीद याला दोषी ठरविले. त्याची आत्या शबनुरबी ऊर्फ छबी शेख मुराद हिला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. सरकारतर्फे ॲड. सुरेंद्र काबरा यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी यांनी मदत केली.