चाळीसगाव : राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत शिक्षण विभागाची मान्यता न घेता परस्पर नोकर भरती केली. या भरतीस संचालक मंडळाच्या बैठकीत किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यता घेतली नाही, असे अनेक गैरव्यव्हार चौकशीत उघड झाल्यामुळे संस्थेचे संचालक मंडळ निष्प्रभावित करुन संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती का करण्यात येवू नये अशी नोटीस जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेने बजावली आहे. या नोटीसीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.आकीर्टेक्ट धनंजय यशवंतराव चव्हाण व इतर ६ विद्यमान संचालकांनी संस्थेत गैर व्यवहाराने नोकर भरती करण्यात आल्याची तक्रार केली होती. संचालक या नात्याने धनंजय चव्हाण यांनी संस्थेच्या या कामकाजाबाबतची माहिती मागितली होती. ती देण्यास संस्थेकडून टाळाटाळ झाली म्हणून चव्हाण यांनी संस्था कार्यालयासमोर दोन दिवस ठिय्या आंदोलन व तीन दिवस आमरण उपोषण केले होते.अखेर चव्हाण यांच्या तक्रारीवरुन वरिष्ठ पातळीवरुन चौकशी सुरु झाली. त्या चौकशीचा अहवाल जिल्हा उपनिबंधक जळगाव यांच्याकडे सादर झाल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे. या विभागाने चार मुद्दे उपस्थित करुन त्या बाबतची सुनावणी २९ एप्रिल रोजी ठेवली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ (१) (१ अब) अन्वये कर्तव्यात कसुर केल्यामुळे संचालक मंडळाविरुध्द कलम ७८ अ (१) नुसार संचालक मंडळ निषप्रभावित करुन संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती का करण्यात येवू नये अशी कारणे दाखवा नोटीस १८ संचालकांना बजावण्यात आली आहे.चार मुद्यांवर घेतला आक्षेप एकूण मंजुर पदांपैकी रिक्त पदावर प्रथम अनुदानित पदावर भरतीची परवानगी नसतांना संस्थेने विना अनुदानित तत्वावर पदे भरली.सदर भरतीतील उमेदवारांना अनुदानित तत्वावरील रिक्त पदाच्या जागी सेवा बदली करुन शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी नसतांना ही नोकर भरती करण्यात आली.कर्मचारी भरतीचा विषय संचालक मंडळा समोर न येता परस्पर करणे, शिक्षण विभागाची मान्यता घेण्यात आली नाही. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बाबतची मंजुरी घेतलेली नाही. निवड झालेल्या उमेदवारांची संचालक मंडळ बैठकीतही मान्यता घेतल्याचे दिसून येत नाही.मुख्याध्यापक बदली बाबत व्यवस्थापन समितीच्या सभेत ठराव केला. तर काही बदल्यांबाबत व्यवस्थापक कमिटीची ठराव देवून कार्योत्तर मंजुरी घेतल्याचे दिसून येते. या चार मुद्दयांवर जिल्हा उपनिबंधक, सहकार, सहकारी संस्था जळगाव यांनी आक्षेप घेतला आहे.शिक्षण विभागासही आदेशराष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळात झालेल्या बेकायदेशीर नोकर भरती प्रकरणी प्रचलीत नियमानुसार संबंधितांविरुध्द कारवाई करावी. आवश्यक भासल्यास धर्मदाय आयुक्त जळगाव यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आदेश नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जळगाव यांना दिले आहे. या आदेशामुळे शिक्षण विभागाकडूनही कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहे.प्रतिक्रिया ...सुनावणी होईपर्यंत या प्रक्रियेवर बोलणे योग्य होणार नाही. अभ्यास करुन संस्थेची बाजू सुनावणी प्रसंगी मांडली जाईल. त्यानंतर स्पष्ट बोलता येईल.-अरुण निकम, सचिव, राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळसंस्थेत नियमाची पायमल्ली करुन बेकायदेशीर भरतीय करण्यात आली असून शिक्षणाधिकारी यांनीही दुर्लक्ष केले होते. या बाबत पाठपुरावा केल्यामुळे प्रथमदर्शनी गैरव्यवहार उघडकीस आला आहे. सुनावणी नंतर संबंधितांवर निश्चितच कारवाई होईल असा विश्वास आहे.- धनंजय यशवंतराव चव्हाण, तक्रारदार व संचालकराष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ, चाळीसगाव
चाळीसगाव येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेस प्रशासक नियुक्तीची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 6:51 PM