शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

सत्ताधारी भाजपाच्या सात नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 7:25 PM

मनपाच्या गुरुवारी झालेल्या महासभेत गैरहजर राहणाऱ्या सत्ताधारी भाजपाच्या सात नगरसेवकांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई करण्याचा हालचाली सुरू आहेत.

ठळक मुद्देमनपाच्या गुरुवारी झालेल्या महासभेत गैरहजर राहणाऱ्या सत्ताधारी भाजपाच्या सात नगरसेवकांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई करण्याचा हालचाली सुरू आहेत.गैरहजर राहणाऱ्या सात नगरसेवकांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गाळेधारकांवर लावलेला पाच पट दंडाची रक्कम रद्द करण्याचा ठराव गुरुवारी झालेल्या मनपा महासभेत घेण्यात आला.

जळगाव - मनपाच्या गुरुवारी झालेल्या महासभेत गैरहजर राहणाऱ्या सत्ताधारी भाजपाच्या सात नगरसेवकांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई करण्याचा हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गैरहजर राहणाऱ्या सात नगरसेवकांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून खुलासे मागविले आल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली. 

गाळेधारकांवर लावलेला पाच पट दंडाची रक्कम रद्द करण्याचा ठराव गुरुवारी झालेल्या मनपा महासभेत घेण्यात आला. या ठरावावेळी शिवसेना सदस्य तटस्थ राहिले. यानंतरही बहुमताने हा ठराव भाजपाने मंजूर करून आणला. मात्र, या ठरावाच्या वेळी भाजपाश्रेष्ठींनी सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचा सूचना दिल्यावरदेखील सात नगरसेवक महासभेत गैरहजर राहिले. तर तीन नगरसेवकांनी महासभेच्या दिवशी रजा घेतली होती. त्यामुळे या नगरसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात नगरसेवक कांचन सोनवणे, गायत्री शिंदे, मीना सपकाळे, दत्तात्रय कोळी, चेतन सनकत, सुनील खडके व रेखा पाटील हे सात नगरसेवक गैरहजर होते. या नगरसेवकांकडून खुलासे मागविण्यात आले. हे खुलासे आमदार चंदूलाल पटेल यांच्याकडे देण्यात आले आहेत.  गैरहजर राहणाऱ्या या नगरसेवकांना भाजपाकडून ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकण्याचेही संकेत देण्यात आले आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावBJPभाजपा