जळगाव : आजारपणाच्या नावाने वारंवार रजेवर (सीक रिपोर्ट) जाणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचे वेतन थांबविण्याचासह तीन वर्ष वेतनवाढच न करण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून जाणीवपूर्वक सीक रजेवर गेलेल्या २४ पोलिसांना मंगळवारी तीन प्रकारच्या नोटीसा पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक शिंदे यांनी ‘लोकमत’ ला दिली.गेल्या काही दिवसापासून अनेक अधिकारी व कर्मचारी वारंवार सीक रजेवर जात आहेत. अशा कर्मचाºयांची माहिती संकलित केली असता आजारपणाच्या नावाने अनेक जण घरीच थांबून आहेत तर कोणी सहलीचा आनंद घेत आहेत. परिणामी या कर्मचाºयांमुळे इतर कर्मचाºयांवर अतिरिक्त ताण पडत आहेत. सीक रजेवर गेलेल्या कर्मचाºयांची गोपनीय माहिती काढल्यावर अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचे शिंदे यांनी सांगितले.तत्काळ हजर होण्याचे आदेशमंगळवारी जिल्ह्यातील २४ पोलिसांना महाराष्टÑ पोलीस अधीनियम १४५ अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या. हे कर्मचारी विनाकारण रजेवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कर्मचाºयांनी तत्काळ कर्तव्यावर हजर व्हावे, जे कर्मचारी ड्युटीवर हजर होणार नाहीत त्यांचे वेतन थांबविले जाणार आहे. त्यानंतर या कर्मचाºयांची तीन वर्ष वेतनवाढच रोखली जाणार आहे. गेल्या काही महिन्यापासून बहुतांश व विशिष्ट पोलीस कर्मचारीच सीक रजेवर जात असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.३०० पोलिसांना दाखविणार ‘उरी’ चित्रपटप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर २५० कर्मचारी व ५० अधिकारी यांना परिवारासह २४ जानेवारी रोजी सायंकाळी ‘उरी’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. पोलीस मानव संसाधन विभागाच्या फंडातून चित्रपटाचा खर्च केला जाणार असल्याची माहिती अधीक्षक शिंदे यांनी दिली. पोलीस व त्यांच्या परिवाराला प्रेरणा मिळावी, देशभक्तीपर भावना निर्माण व्हाव्यात या हेतून या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे. सैन्य दलाला गौरव निर्माण करणारा हा चित्रपट आहे. २६ जानेवारी तसेच विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या दौºयानिमित्त होणारी परेड या कामातून मन हलके व्हावे म्हणून पोलीस व त्यांच्या परिवाराला चित्रपट दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आजारपणाच्या नावाखाली अनेक अधिकारी व कर्मचाºयांनी रजा घेतली आहे. प्रत्यक्षात बहुतांश जण बाहेर फिरताना आढळून आले आहे. तर काही जण चुकीचे कामे करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे विनाकारक खोटे सांगून आजारपणाच्या नावाखाली रजा घेणारे २४ जण निष्पन्न झाले आहेत. आज या सर्वांना नोटीसा बजावण्यात आल्या.-दत्तात्रय शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक
आजाराच्या नावाने दांडी मारणाऱ्या पोलिसांना नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:23 AM
एस.पींचा २४ जणांना दणका
ठळक मुद्दे तीन वर्ष वेतनवाढ होणार नाही