संजय सोनवणेचोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील चहार्डी येथील शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट देण्यासाठी संचालक मंडळाकडून पुन्हा ११ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे. याबाबतचे लेखी हमी पत्रही तहसीलदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कारखान्यातर्फे देण्यात आले आहे.चहार्डी येथील सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्त्वावर चालविण्यासाठी पुणे येथील सृष्टी शुगर कंपनीला देण्यात आल्याचा ठराव सभासद शेतकºयांनी १५ आॅक्टोबर रोजी करून दिला आहे. त्याच वेळेस सभेत २१ आॅक्टोबरपर्यंत दिवाळीपूर्वीच शेतकºयांना उसाचे थकित पेमेंट देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र आॅक्टोबर महिना संपला तरीही शेतकºयांना त्यांच्या उसाचे पैसे मिळेनासे झाल्याने शेतकरी कृती समितीच्या तक्रारीनुसार तहसीलदार अनिल गावीत यांनी शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाºयांसोबत व संचालक मंडळाबरोबर १ रोजी दुपारी ३ वाजता बैठक घेण्याचे ठरविले होते. मात्र त्या बैठकीकडेही चेअरमनसह संचालक मंडळाने पुन्हा पाठ फिरवल्याचे दिसून आले, तर चेअरमन अतुल ठाकरे यांनी चर्चेसाठी प्रभारी कार्यकारी संचालक अकबर पिंजारी यांना सभेला पाठविल्याने अखेर प्रभारी कार्यकारी संचालक पिंजारी यांनी ११ नोव्हेंबरपर्यंत ज्या शेतकºयांचे उसाचे पैसे चोसाकाकडे थकीत आहेत, त्यांना देण्यात येतील, असे लेखी हमी पत्र दिले. शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस. बी. पाटील हे शेतकºयांना उसाचे पैसे मिळत नसल्याने आत्मदहन करणार होते, मात्र तूर्त ११ नोव्हेंबरपर्यंत शेतकरी आत्मदहनाचा निर्णय स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.या बैठकीला एस.बी.पाटील, भागवत महाजन, अजित पाटील, तुकाराम पाटील, प्रवीण चौधरी, प्रकाश पाटील, संदीप शिरसाट, भरत पाटील, गजानन पाटील, शांताराम पाटील, नरेंद्र चौधरी, भटू चौधरी, कुलदीप पाटील, मुकुंद पाटील, सुरेश पाटील, पंडित पाटील, नितीन निकम, प्रशांत पाटील, भास्कर बाबूराव पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.साखर आयुक्तांकडे संचालक मंडळाविरोधात तक्रार करणार१ च्या सभेकडे पुन्हा चेअरमन व संचालक मंडळाने पाठ फिरवल्याने आणि शेतकºयांना पैसे न मिळाल्याने तहसीलदार अनिल गावीत हे पुणे येथील साखर आयुक्तांकडे चेअरमन व संचालक मंडळाच्या विरोधात कारवाई होण्यासाठी पत्र पाठवणार आहेत, तर शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस. बी. पाटील हेदेखील आयुक्तांची भेट घेऊन संचालक मंडळाविरुद्ध तक्रार करणार आहे.पाठ फिरवली नाही- चेअरमन अतुल ठाकरे१ नोव्हेंबरच्या सभेकडे पाठ फिरवण्याचा प्रश्न नाही. १ रोजी दुपारी बारा वाजता तहसीलदारांंची त्यांच्या दालनात भेट घेतली आणि न्यायालयात दुपारून जायचे असल्यामुळे त्यांना संपूर्ण माहिती देऊन नंतरच गेलो, अशी प्रतिक्रिया चो.सा.का.चे चेअरमन अतुल ठाकरे यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांचे उसाचे पैसे देण्यासाठी पुन्हा ११ नोव्हेंबरचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 11:00 PM
चहार्डी येथील शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट देण्यासाठी संचालक मंडळाकडून पुन्हा ११ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे.
ठळक मुद्देतहसीलदार पाठविणार संचालक मंडळावर कारवाईसाठीचे पत्रसाखर आयुक्तांकडे संचालक मंडळाविरोधात तक्रार करणारपाठ फिरवली नाही- चेअरमन अतुल ठाकरे