जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. ३ रोजी निकाल जाहीर होणार असून त्यात काय होते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मनपा निवडणुकीत यावेळी चार सदस्यीय प्रभाग रचना असल्यामुळे मतदारांना चार मते द्यावयाची होती. मात्र, बुधवारी मतदानादरम्यान, काही मतदान केंद्रावर अनेक मतदारांनी केवळ तीन मते देवून मतदान केंद्र सोडल्याचा प्रकार आढळून आला. त्यामुळे मतदान कर्मचाऱ्यांनाच उमेदवार प्रतिनिधींसमोर नोटा चे बटन दाबून मतदान प्रक्रिया पार पाडून घ्यावी लागली. मतदान प्रक्रियेबाबत अनेक मतदारांमध्ये संभ्रम दिसून आला.मनपा निवडणुकीसाठी मतदारांना पहिल्या १८ प्रभागात चार तर १९ व्या प्रभागात तीन मते द्यावयाची होती. पहिल्यांदाच मतदान यंत्रावर मतदारांना सदस्यांसाठी मतदान करावयाचे होते. मात्र, मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांना मतदान करताना अडचणी आल्या. काही मतदारांनी मतदान करताना दोन वेळाच बटन दाबले तर काही मतदार अ गटामधील मतदारांनाच पुन्हा पुन्हा मतदान करताना दिसून आले. तर काही मतदारांनी तीन मते दिल्यानंतर मतदान केंद्र सोडले होते. मतदान करताना केवळ अशिक्षीत किंवा ज्येष्ठ नागरिकांनाच अडचणी आल्या नाहीत. तर अनेक सुशिक्षीत मतदार देखील संभ्रमात दिसून आले.
आता उत्सुकता निकालाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 1:22 PM
३ रोजी निकाल
ठळक मुद्देपहिल्या १८ प्रभागात चार मते१९ व्या प्रभागात तीन मते