विजयकुमार सैतवालजळगावात उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळून विविध सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होण्यासह मोहाडी रस्त्यावर उभारण्यात येणाºया स्वतंत्र महिला रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील रुग्णांना आता दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, कुटीर रुग्णालय येथील रिक्त पदांसह विविध सुविधांचा अभाव यामुळे जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न नेहमी ऐरणीवर राहिलेला आहे. याच समस्यांमुळे खुद्द माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता व हा विषय विधानसभेतही पोहचला. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी मिळण्याची ग्वाही देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात अधिकारी काही मिळाले नाही. मात्र दुसरीकडे आता जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने सुखावह बाब म्हणजे जळगावात उभारण्यात येणाºया वैद्यकीय महाविद्यालयास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) मान्यता दिली आहे तर आरोग्य विभागाच्यावतीने उभारण्यात येणाºया स्वतंत्र महिला रुग्णालयाचेदेखील काम सुरू झाले आहे. जिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याविषयी एमसीआयकडे प्रस्ताव होता. त्यानुसार आता मान्यता मिळाल्याने नेहमी विविध समस्या जाणवणाºया जिल्हा रुग्णालयात या निमित्ताने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक उपकरणे, सुविधा उपलब्ध होतील व त्यातून रुग्णांनाही सेवा मिळण्यास मदत होणार आहे. आॅगस्ट २०१८ पासून जळगाव येथे १०० जागांसाठी हा अभ्यासक्रम सुरू होऊ शकणार असल्याने किमान आॅगस्टपूर्वीच आवश्यक कामे मार्गी लागून चांगली आरोग्य सेवा मिळण्यास वाव राहणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला जात आहे.या सोबतच जिल्हा रुग्णालयातील जागेची व खाटांची कमतरता लक्षात घेता महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यास मान्यता मिळाल्यानंतर आता त्याच्या प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील भार कमी होऊन येथे जे रुग्ण येतील त्यांच्यासह महिला रुग्णालयात चांगली सेवा मिळू शकेल. मोहाडी रस्त्यावर उभारण्यात येणाºया या रुग्णालयाती दाखल होणाºया महिलांसाठी आवश्यकता पडल्यास एक्स-रे मशिन, सोनोग्राफी मशिन व इतर संबंधित उपकरणेही राहणार आहे. या सोबतच नवजात बालकांसाठी नवजात शिशू कक्ष व त्यामध्ये बालकांना ठेवण्यासाठी पेटीदेखील राहणार आहे. या ठिकाणी १०० खाटांचे महिला रुग्णालय तसेच मुख्य इमारत व अधिकारी-कर्मचाºयांचे निवासस्थान राहणार आहे. यामुळे कोणत्याही सुविधेअभावी रुग्णांचे हाल होणे आता थांबणार असून तेथेच निवासस्थान राहणार असल्याने वेळेवर उपचार मिळणेही शक्य होणार आहे. त्यामुळे आता चांगल्या आरोग्यसेवेची अपेक्षा केली जात आहे.
आता दर्जेदार सेवेची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:24 PM