किनगाव, ता. यावल : किनगाव बुद्रुक गावात आता जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना एकप्रकारे सुरक्षितता लाभली आहे. ग्रामपंचायतने हे काम केले असून, याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे मागील काही दिवसांपासून गावात घरफोड्या व चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहता या विषयांची गंभीर दखल किनगाव ग्रामपंचायतीने घेतली. चोऱ्यांना आळा बसावा यासाठी किनगाव येथील महत्त्वाच्या विविध ठिकाणी एकूण १८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा माजी आमदार रमेश चौधरी यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
गावातील मुख्य रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हनुमान मंदिर, जामा मशीद त्याचबरोबर चुंचाळे रस्ता या महत्त्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आल्याने सुरक्षा कायम राखण्यासाठी हे चांगले पाऊल उचलल्याचे मत पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी सरपंच निर्मला संजय पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य उमाकांत रामराव पाटील, उपसरपंच लुकमान कलंदर तडवी, माजी ग्रा.पं.सदस्य संजय सयाजीराव पाटील, किनगाव क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, शेतकरी संघटनेचे कडू पाटील, पोलीसपाटील रेखा नायदे, किनगाव खुर्दचे सरपंच भूषण नंदन पाटील, अमिन शेख, अमन मन्यार, साधना चौधरी, मेहमूद तडवी, सफदर तडवी, लतिफ तडवी, माजी सरपंच रामकृष्ण धनगर, माजी सरपंच टिकाराम चौधरी, बंटी पाटील, किरण सोनवणे, संदीप पाटील, राजू चौधरी, रवि पाटील, आनंदा महाजन, लोकेश महाजन आदी उपस्थित होते.