भुसावळ : वेगवेगळ्या शहरातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून भुसावळ स्पोर्टस अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे प्रत्येक शनिवार हा सायकल दिवस म्हणून पाळला जाणार आहे. शनिवारी शहरात कुठल्याही कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास दुचाकी-चारचाकी व इतर कुठल्याही वाहनांचा वापर न करता, सायकलचा वापर करणे हे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे असेही आवाहन करण्यात आले आहे की सध्या अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर जावे.लहान मुले सायकल सहज व आनंदाने चालवतात. परंतु महाविद्यालयीन जीवनापासून नागरिक सायकलपासून कायमचे लांब होतात. कित्येकांना तर अशी भीती असते की, लहानपणी सहज कित्येक किलोमीटरपर्यंत फिरणारी सायकल आता आपल्याला जमेल की नाह. परंतु सायकलींग, घोडेस्वारी व पोहणे या तीनही कला मनुष्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत सोबत असतात. गरज असते ती फक्त धैर्याची व सरावाची.तसं पाहिल्यास सायकलने शहरात प्रवास करणे सहजशक्य आहे. त्याचे फायदेदेखील अनेक आहेत. शहरातील अरुंद व अधिक रहदारीच्या रस्त्यांवर सायकलचा प्रवास सहज व वेळ वाचविणारा तसेच आनंददायी होय. शिवाय प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी सायकल हा पर्याय सर्वोत्तम आहे. त्यामुळे जगातील असंख्य शहरात आठ ते दहा किलोमीटरसाठी नागरिक सायकल वापरतात. शिवाय सायकलिंगमुळे शहरात जाणवणारी पार्किंगची समस्यादेखील काही प्रमाणात कमी होईल.सायकल एक उत्तम पर्याय आहे. नियमित वापरामुळे आपणास रात्री शांत झोप लागू शकते. त्यामुळे या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सुरू होणाऱ्या या अभियानात शहरातील खासगी तसेच सरकारी कार्यालये, विविध संघटना व समस्त नागरिकांनी सहभागी होऊन भारताला आत्मनिर्भरतेकडे नेण्यास मदत करावी, असे आवाहन प्रवीण फालक, डॉ.तुषार पाटील व प्रवीण पाटील यांनी केले आहे.
आता शनिवार होणार ‘सायकल डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 5:05 PM
वेगवेगळ्या शहरातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून भुसावळ स्पोर्टस अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे प्रत्येक शनिवार हा सायकल दिवस म्हणून पाळला जाणार आहे.
ठळक मुद्दे१५ आॅगस्टपासून अंमलबजावणीभुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचा उपक्रम