धुळे : महापालिकेच्या प्रस्तावित शहर हद्दवाढीवर दाखल झालेल्या हरकतींवर घेण्यात आलेल्या सुनावणीचा अहवाल अभिप्रायासह सोमवारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला सादर केला़ या अहवालामुळे हद्दवाढीचा मार्ग मोकळा झाला असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने कोणत्याही क्षणी हद्दवाढ लागू होणार असल्याने मनपावर आता बरखास्तीचे ढग जमू लागले आहेत़ धुळे महापालिकेची हद्दवाढ करण्याबरोबरच मनपा बरखास्त करण्यात यावी, यासाठी शहराचे आमदार अनिल गोटे यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत़ त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी तसा निर्णय घेतला तर मनपा बरखास्त होऊ शकत़े महापालिका अस्तित्त्वात आल्यापासून शहराची हद्दवाढ प्रथमच प्रस्तावित असून ती लागू होणे क्रमप्राप्त आह़े परंतु हद्दवाढीनंतर मनपा बरखास्त होणार का? हा प्रश्न नगरसेवकांसह सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना देखील पडला आह़े 103 चौ़ कि. मी. क्षेत्राचा समावेश मनपाचे सध्याचे क्षेत्र 46़46 चौरसवर्ग किलोमीटर आह़े शहर हद्दवाढीत 16 गावांमधील एकूण 164 चौरसवर्ग किलोमीटर क्षेत्रापैकी 103़97 चौरसवर्ग किलोमीटर क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आह़े सहा गावांचा पूर्णत: तर अकरा गावांचा अंशत: समावेश हद्दवाढीत होणार आह़े हद्दवाढीनंतर संबंधित ग्रामपंचायतींमधील कर्मचारी मनपाकडे वर्ग केले जाऊ शकतात़ आकृतीबंधाला मंजुरी शहर हद्दवाढीची शक्यता लक्षात घेऊनच मनपाचा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आकृतीबंध व सेवानियमावलीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आह़े त्यामुळे मनपाचे हद्दवाढीनंतर विस्तारणारे क्षेत्र हाताळण्यासाठी अधिकचे कर्मचारी भरले जाऊ शकतात. पदभरतीचा मार्ग या प्रस्ताव मंजुरीमुळे मोकळा झाला आह़े शहर हद्दवाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़ मनपा प्रशासनाची पूर्वतयारी शहराच्या हद्दवाढीवर जरी 136 हरकती दाखल झाल्या असल्या तरी हद्दवाढ कुठल्याही परिस्थितीत रोखली जाऊ शकत नाही, याची जाणीव मनपा प्रशासनाला आह़े त्यामुळे प्रत्येक विषयात निर्णय घेताना संभाव्य हद्दवाढ लक्षात घेऊनच निर्णय घेतले जात आहेत़ पांझरा नदी सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव, अवधान गावाला मनपाच्या जलवाहिनीवरून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय, उत्पन्नवाढीसाठी होत असलेल्या प्रयत्नांवरून मनपा प्रशासनाची हद्दवाढीच्या पाश्र्वभूमीवर पूर्वतयारी सुरू असल्याचे दिसून येत आह़े जमिनी अकृषक करण्याचा अधिकार मनपाला देण्यात आला असून वाढीव एफएसआयबाबतदेखील लवकरच निर्णय अपेक्षित आह़े संभाव्य हद्दवाढ लक्षात घेऊन शासनाकडूनदेखील मनपाला उत्पन्नवाढीचे स्नेत दिले जात आहेत़ मनपा बरखास्तीसाठी प्रयत्न.? महापालिकेची हद्दवाढ लागू करण्याबरोबरच मनपा बरखास्त होऊ शकत़े त्यासाठी आमदार अनिल गोटे यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न अजूनही सुरू आहेत़ मनपा बरखास्तीची शक्यता लक्षात घेऊन नगरसेवक देखील आपापल्या प्रभागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी धावपळ करताना दिसतात़ अर्थात याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत असली तरी हद्दवाढीबरोबर मनपा बरखास्त व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ संभाव्य निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मनपातील मुख्य रिक्त पदेदेखील भरली जात असून हद्दवाढीशी संबंधित प्रत्येक निर्णयात आमदार अनिल गोटे पुढाकार घेत असल्याचेही दिसून येत़े
महापालिकेवर आता बरखास्तीचे ढग!
By admin | Published: February 09, 2016 12:25 AM