शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

आता ट्रकमधून वाळूची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 9:58 PM

वाळूमाफियांची नवी शक्कल : पोलिसांच्या अहवालावर महसूलकडून कारवाई नाही

जळगाव : कारवाई टाळण्यासाठी वाळू माफियांनी आता ताडपत्री झाकलेल्या ट्रकमधून वाळूची तस्करी करायला सुरुवात केली आहे. एमआयडीसी पोलिसांनी अयोध्या नगरात असा वाळूचा ट्रक पकडला आहे. एका ठिकाणी या ट्रकमधून वाळू उपसली जात असतानाच हा ट्रक जप्त केला. त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांना पाठविला, मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.शहरात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैध वाळूची तस्करी सुरु आहे. आव्हाणे, धानोरा, वडनगरी, निमखेडी, फुपनगरी, खेडी या भागातून दिवसरात्र वाळूचा उपसा सुरु असून ट्रॅक्टर व डंपरद्वारे त्याची वाहतूक केली जात आहे. दुसरीकडे गस्तीवर पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीचे वाहने पकडली तरी त्यावर महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने नेमके पाणी कुठे मुरतयं असा प्रश्न उपस्थित होत आहे.गेल्या आठवड्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांनी अयोध्या नगरात ताडपत्री झाकलेला वाळूचा ट्रक (क्र.एम.एच.१९ जे. ९०५) पकडला होता. हा ट्रक पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे, गुन्हा दाखलपेक्षा दंडात्मक कारवाई मोठी असल्याने पोलिसांनी तहसीलदारांकडे ट्रक व वाळूचा अहवाल पाठविला,मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.अहवाल तीन महिन्यापासून पडूनसहायक फौजदार आनंदसिंग पाटील यांनी ३० आॅगस्ट रोजी पहाटे पाच वाजता कोम्बींग आॅपरेशनच्यावेळी मेहरुण भागात विना क्रमांकाचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले होते. या टॅÑक्टर चालकाकडे वाहन परवाना, गौण खनिज परवाना व इतर कोणतेच कागदपत्रे नव्हते. चालकाचे नाव सुधाकर विनोद सपकाळे (३६, रा.खेडी कढोली, ता.एरंडोल) असे निष्पन्न झाले. आनंदसिंग पाटील यांनी त्याच दिवशी महसूल विभागाला कळवून तलाठ्याच्या ताब्यात ट्रॅक्टर दिले त्यानंतर तहसीलदारांना लेखी अहवाल सादर केला. या ट्रॅक्टरचे पुढे काय झाले त्याची काहीच माहिती देण्यात आली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.-याआधी देखील पोलिसांनी पकडलेले वाहने महसूल विभागाने परस्पर सोडून दिल्याचा प्रकार घडला आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयातूनही वाहने पळविण्यात आली आहेत.-वाळू माफियांची महसूल, पोलीस व आरटीओ या तिन्ही विभागातील काही मोजक्या अधिकाऱ्यांशी मिलिभगत असल्याचा संशय असून काहींची तर थेट भागीदारीच आहे.वाळूत भागीदारी असलेल्या पोलिसांवर याआधी कारवाया झाल्या आहेत तर अजूनही काही पोलीस सक्रीय आहेत. दुसºयाच्या नावावर डंपर घेऊन हा व्यवसाय सुरु केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव