नंदुरबार,दि.15- जिल्ह्यातील 218 खत विक्रेत्या शेतक:यांना पीओएस मशिनद्वारेच खत विक्री करावे लागणार आहे. शिवाय शेतक:यांना देखील आधार कार्डशिवाय खते मिळणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. 1 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही कृषी विभागातर्फे देण्यात आली.
रासायनिक खताचे विक्रीवरील अनुदान थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत संबधीत उत्पादक, पुरवठादार यांना अदा केली जाणार आहे. शेतक:यांना एमआरपी दरानेच खते बाजारात उपलब्ध होणार आहेत. 1 जून पासून जिल्ह्यात राबविण्यात येणा:या या योजनेसाठी लागणारे पीओएस मशीन हे एमएफएमएस प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या किरकोळ विक्रेत्यांना खत उत्पादक, पुरवठादार कंपन्यांमार्फत पुरविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात अशा विक्रेत्यांची संख्या 218 आहे. या मशिनमधील नोंदीनुसारच खत उत्पादकांना सबसिडी मिळणार आहे.
शेतक:यांना आधार कार्डावरच खत खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतक:याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व किरकोळ खत विक्रेत्यांनी लवकरात लवकर एमएफएमएसवर नोंदणी करावी. जेणेकरून 1 जूनपासून पीओएस मशीनवर खत विक्री करता येईल. नोंदणीकरीता विक्रेत्यांनी त्यांचा वैध परवाना, आधारकार्ड, ओ फॉर्म व इतर आवश्यक कागदपत्रांसह रासायनिक खत कंपनी प्रतिनिधी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करून नोंदणी करावे. नोंदणी न केल्यास विक्रेत्यांना खत कंपनीकडून खते उपलब्ध होणार नाहीत असेही जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी उमाकांत पाटील यांनी सांगितले.