पुण्याच्या सेवानिवृत्त शिक्षिका रंजना खंडेराव घोरपडे (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीत फसवणुकीचा आकडा १७ लाख ८ हजार ७४२ इतका होता तर आतापर्यंत तपासात ही रक्कम ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांपर्यंत पोहोचली असून, अटकेतील बड्या कर्जदारांच्या चौकशीत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अटकेतील संशयितांची संख्या पोहोचली १७ वर
बीएचआर फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची संख्या २३ पर्यंत पोहोचली असून, अटकेतील संख्या १७ वर पोहोचली आहे. अजून सहा जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
अशी आहे संशयितांची सद्यस्थिती
हे आहेत कारागृहात
बीएचआर घोटाळ्यात सुजीत सुभाष बाविस्कर(४२,रा.सेंट्रल बँक कॉलनी) व विवेक देवीदास ठाकरे (४५,रा.देवेंद्र नगर) दोघंही अद्याप कारागृहात असून, त्यांचा जामीन अर्ज वेळोवेळी फेटाळण्यात आलेला आहे.
यांना मिळाला आहे जामीन
धरम किशोर सांखला (४०, रा. शिवकॉलनी) याला ७ जून तर महावीर मानकचंद जैन (वय ३७, रा.गुड्डूराजा नगर) याला ९ एप्रिल रोजी जामीन मंजूर झाला. कमलाकर भिकारी कोळी (२८,रा.के.सी.पार्क) २९ नोव्हेंबर रोजी अटक झाली होती तर ५ जानेवारी रोजी जामीन मंजूर झाला. सूरज सुनील झंवर (२९,रा.जय नगर) याला २२ जानेवारी रोजी अटक झाली होती तर २८ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
हे आहेत अंतरिम जामिनावर
प्रकाश जगन्नाथ वाणी (रा.ठाणे) याला ८ फेब्रुवारी तर अनिल रमेशचंद्र पगारिया (रा.शिवराम नगर) याला ९ फेब्रुवारी २०१२१ पर्यंत न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
यांचा शोध सुरू आहे
जितेंद्र गुलाबराव कंडारे (रा.शिवाजी नगर), सुनील देवकीनंद झंवर (रा.जय नगर), योगेश किशोर साखला (रा.शिव कॉलनी), योगेश रामचंद्र लढ्ढा (रा.पाळधी, ता.धरणगाव) व माहेश्वरी (रा.जळगाव).
हे आहेत पोलीस कोठडीत
प्रेम नारायण कोगटा (रा.जळगाव), जयश्री अंतिम तोतला, भागवत गणपत भंगाळे (रा.जळगाव), जयश्री शैलेश मणियार, संजय भगवानदास तोतला (सर्व रा. जळगाव ह.मु.मुंबई), छगन श्यामराव झाल्टे (रा.महुखेडा, ता.जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (रा.जामनेर), राजेश शांतीलाल लोढा (रा.जामनेर), आसिफ मुन्ना तेली (रा.भुसावळ), प्रीतेश चंपालाल जैन (रा.धुळे), जयश्री अंतिम तोतला (रा.मुंबई, मुळ रा. जळगाव).