जळगाव : गेल्या तीन दिवसात शहरात ५७ रुग्ण आढळून आले आहेत़ यात शुक्रवारी १३ रुग्णांचे शासकीय व ४ रुग्णांचे खासगी लॅबकडून अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात एलआयसी कॉलनीतील एका इमारतीत तसेच मानराज पार्क या दोन नवीन भागात रूग्ण आढळून आलेले आहेत़शहरातील रूग्णसंख्या ३८१ वर पोहाचली आहे़ यापैकी २५ जणांचा मृत्यू झाला आहे. २४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ सद्यस्थितीत कोविड केअर सेंटर, अधिग्रहीत खासगी रुग्णालय व कोविड रुग्णालय अशा विविध ठिकाणी १११ रुग्ण उपचार घेत आहेत़ जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरातील आहेत़ त्यात दररोज रुग्णांची भर पडत असून काही दिवसातच रुग्णांची शंभरी पार झाली आहे़ यात सलग तिसऱ्या दिवशी दोन आकडी रुग्णसंख्या आली आहे़ रुग्णसंख्या चारशेच्या उंबरठ्यावर आलेली आहे़ शाहू नगर भागात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे़हुश्श़़.! वॉररूमचे योद्धे निगेटीव्हजिल्हाधिकारी कार्यालयात पूर्ण जिल्हाभरातील तक्रारींचे निवारण करणाºया वॉर रूममधील एक कर्मचारी बाधित आढळून आला होता. भवानी पेठेत राहणाºया या ३९ वर्षीय व्यक्तिचे अहवाल गुरूवारी रात्री पॉझिटीव्ह आले होते़ मात्र सुदैवाने या कर्मचाºयाच्या संपर्कातील वॉर रूममधील सुमारे १५ कर्मचारी हे निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे़ जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे स्वत: या अहवालांकडे लक्ष देऊन होते़ भवानी पेठेतील बाधित संबधित कर्मचारी हे दोन दिवस प्रकृती खराब असल्याने कोविड केअर सेंटरला दाखल होते़ त्यांचे गुरूवारी अहवाल पॉझिटीव्ह आले़या भागात आढळले रुग्णखोटेनगर २, बुनकर वाडा, शाहू नगर, रामेश्वर कॉलनी मेहरूण, शेरा चौक मेहरूण, तांबापुरा, हुडको पिप्रांळा, रिंगरोड एलआयसीकॉलनी, शंभरफुटी रोड लगत कोल्हेनगर यासह खोटेनगर, एमआयडीसी, मानराज पार्क व शाहू नगर येथे प्रत्येकी १ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.बरे होण्याचा दर देशापेक्षा सहा टक्क्यांनी अधिकजिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतानाच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे. जिल्ह्यात आजपर्यंत आढळून आलेल्या २०७४ कोरोना बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत १२५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा हाच दर ५०.४ इतका असून देशाचा हा दर ५३.८ इतका आहे. देशाच्या या दरापेक्षा जळगाव जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा सहा टक्क्यांपेक्षा अधिकआहे.
शहरात रुग्णसंख्या चारशेच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:57 AM