जळगाव : शहरात डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंत शहरात डेंग्यूसदृश्य आजाराच्या रुग्णांची संख्या १३५ वर पोहचली असल्याची माहिती मनपातील डेंग्यू, मलेरिया नियंत्रण विभागाकडून देण्यात आली. गेल्या आठवड्यात औरंगाबादला तपासणीसाठी पाठविलेल्या ५० पैकी २० रुग्णांचे नमुने ‘पॉझीटीव्ह’ आले आहेत.डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना, मनपा प्रशासनाने देखील याबाबत उपाययोजना सुरु केल्या आहेत. मनपाकडून आधीच शंभर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र, तरीही डेंग्यू आटोक्यात न आल्यामुळे मनपा प्रशासन व आरोग्य विभागाच्या उपायोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. शहरात दिवसभरात एक वेळेस धुरळणी होत असून, आता ज्या भागात सर्वाधिक डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आहेत. त्या भागात दिवसभरात दोन वेळा धुरळणी करण्याचा आदेश मनपा प्रशासनाने दिले आहेत. डेंग्यू सदृश्य आजाराचे सर्वाधिक रुग्ण गणपती नगर व जीवन नगर भागात आढळून आले आहेत.औरंगाबादला पाठविले ५० नमुने२० नमुने ‘पॉझीटीव्ह’ आढळलेल्यांवर रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, बुधवारी देखील आणखी ५० रुग्णांचे नमुने औरंगाबादला तपासणीसाठी पाठविले आहे.
डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांचा आकडा १३५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:26 PM