लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव शहरातील रुग्णसंख्या कमी होऊन जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आता अन्य तालुक्यात आढळून येत आहेत. चोपड्यात रविवारी सर्वाधिक १३६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जळगाव शहरात १०६ नवे कोरोना बाधित आढळून आले असून ११६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. २ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहरात सातत्याने जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याची नोंद होत असताना रविवारी मात्र चित्र वेगळे होते. शहरात कोरोना थांबत असल्याचे अनेक दिवसांच्या अहवालावरून समोर येत असताना आता कोरोनाचा दुसऱ्या भागात सर्वाधिक संसर्ग होत आहे. चोपड्यात अचानक एका दिवसात १३६ रुग्ण आढळून आले आहेत. यासह, जामनेर, मुक्ताईनगर अशा भागातही रुग्ण समोर येत आहे. जळगाव ग्रामीणमध्ये २१ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, मृतांमध्ये जळगाव शहरातील ६६ वर्षीय पुरूष व ८८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यासह भुसावळ तालुका ४ , जामनेर, मुक्ताईनगर प्रत्येकी ३, यावल २ तर रावेर, धरणगाव, एरंडोल या भागात प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
सक्रिय रुग्ण ९८०४
लक्षणे असलेले रुग्ण २३७५
लक्षणे नसलेले रुग्ण ७४२०९
ऑक्सिजनवरील रुग्ण १३४७
आयसीयूतील ७१३
सुटीच्या चाचण्याही कमी
रविवारी नियमित चाचण्यांचे प्रमाण कमी असते, तसेच चित्र या रविवारीही समोर आले असून ॲन्टींजन चाचण्या निम्म्याहून कमी झाल्या आहेत. ४२०४ चाचण्यांमध्ये ५८० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर आरटीपीसीआरचेही नियमीतपेक्षा कमी अहवाल समोर आले आहेत. आरटीपीसीआरच्या १४०३ अहवालांमध्ये २५८ बाधित आढळून आले आहेत. तर १७१२ आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आलेल्या आहेत.