जळगाव : शासकीय पातळीवर क्षयरोगाचे रुग्ण शोधण्याची मोहीम गेल्या काही वर्षांत अधिक तीव्र करण्यात आली आहे. वर्षाला सरासरी साडेतीन ते चार हजार नवे क्षयरोग रुग्ण समोर येत आहेत. यात गेल्या तीन महिन्यांपूर्वी जिल्हाभरात क्षयरोग रुग्ण तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ६७७ क्षयरोगाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे यांनी सांगितली.
दरम्यान, कोविडमुळे आता ही शोधमोहीम काहीशी थंड झाली आहे. यंत्रणा कोविडकडे वळली आहे. शिवाय कोविडच्या काळात क्षयरोग रुग्णांचे प्रमाण कमी होऊन जाते, असेही चित्र आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत प्रमाण वाढले असे नाही, तर निदानही मोठ्या प्रमाणात व यंत्रणेकडूनच शोध घेतला जात आहे, असेही डॉ. मोरे यांनी सांगितले.