संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : तालुक्यात प्रामुख्याने शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असून, १० रोजी सानेनगर भागातील ५८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण संख्या १०४ झाली आहे. दरम्यान, तपासणीमध्ये काही लक्षणे दिसत नसलेली रुग्णदेखील पॉझिटिव्ह येत असून त्यांची प्रकृती ठणठणीत राहत असल्याने त्यांना १० दिवसांत घरी रवाना करण्याचे नवीन निर्देश शासनाने ९ रोजी दिल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितल.ेशहरातील सानेनगर भागातील एका ५८ वर्षीय महिलेला मधुमेह असल्याने श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तिला जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले होत.े तिचा जळगाव येथे स्वॅब घेण्यात आला होता. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच पैलाड येथील एक रुग्ण महिला पॉझिटिव्ह आढळली, तर पालिकेसमोरील एक जण किडनीच्या आजाराने त्रस्त होता. तो धुळ्याला दाखल होता. रुग्णालयातून पळून आल्याने त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. तांबेपुरा, पालिकेसमोर आणि पैलाड भागात काही परिसर सील करण्यात आला आहे.दरम्यान, अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील कोरोना बाधित महिला कोरोनामुक्त झाली आह,े तर साळीवाड्यातील ४ कोरोना बाधित रुग्ण १४ दिवसांच्या पुनर्तपासणीनंतर निगेटिव्ह आल्याने तालुक्याला दिलासा मिळाला आहे.कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला असला तरी काही व्यक्तींना पॉझिटिव्ह असल्यानंतरही सर्दी, खोकला, ताप यासारखी कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत आणि त्यांच्यानंतरच्या अहवालात ते प्रतिकार शक्ती चांगली असल्याने निगेटिव्ह येत आहेत म्हणून असे रुग्ण १० दिवसात काहीच लक्षणे न दिसल्यास घरी सोडण्यात यावेत व त्यांची पुन्हा चाचणी घेण्याची गरज नसल्याचे नवीन मार्गदर्शक तत्वे केंद्र शासनाने दिले होते. ते राज्य शासनाने ९ मेपासून स्वीकारले असून, १० पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे . मात्र रुग्णांनी काही दिवस घरातच थांबणे आवश्यक आहे. यामुळे शासनाचा खर्चात कपात होऊन प्रशासनाचा ताण कमी होऊन नागरिक व रुग्णांमधील भीती दूर होणार आहे.
अमळनेरातील बाधितांची संख्या १०४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:44 PM
तालुक्यात प्रामुख्याने शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असून, १० रोजी सानेनगर भागातील ५८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण संख्या १०४ झाली आहे.
ठळक मुद्देबाधितांपैकी ५ निगेटिव्ह झालेलक्षणे नसलेल्या रुग्णांना १० दिवसात घरी सोडण्याचे नवे निर्देश