वरखेडी, ता. पाचोरा : जवळच असलेल्या भोकरी गावी नुरानी मदद्गार फाउंडेशनतर्फे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अध्यक्षस्थानी मौलाना जैविक हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते सलिम शेठ, इकबाल बाबू शेख, भोकरी सरपंच मौलाना अरमान, उपसरपंच असलम रूस्तम, सर्व ग्रा. पं. सदस्य, बडोला विद्यालयाचे पर्यवेक्षक एस. के. पाटील, ए. ए. खान, कुऱ्हाड जि. प. उर्दू शाळेचे शिक्षक इस्माईल, भोकरी जि. प. उर्दू शाळेचे शिक्षक मोबीन आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांचे स्वागत नुरानी फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ काकर, सल्लागार मौलाना अकिल आलमगिरी, सचिव शोएब काकर, खजिनदार शोएब नुरानी, सदस्य मिनाज काकर, मोईन काकर, सोहिल हलवाई, हाफिज फारूक, फईम काकर, जावेद काकर, फयाज काकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन केले. एस. एस. सी. उत्तीर्ण झालेल्या सत्कारार्थी विद्यार्थ्यांना इस्माईल, बडोला विद्यालयाचे पर्यवेक्षक एस. के. पाटील, डॉ. अल्ताफ शफी तसेच उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचाली संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसह तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.