जळगाव : कोरोना लसीकरणानंतर जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका आशा तायडे यांना सौम्य स्वरुपाची रिएक्शन आली.
शनिवारी सकाळी लस घेतल्यानंतर तायडे यांच्या घशाला कोरड पडली व कोरडा खोकला येत असल्याचे दिसून आल्याने औषधोपचार करण्यात आले. अर्धा तासानंतर त्यांना घरी पाठविण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले.