भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ ब्लाॅजमतर्फे पोषण आहार सप्ताहांतर्गत कंडारी येथे पोषण आहार वितरण प्रकल्प राबविण्यात आला.
या प्रकल्पांतर्गत गरोदर महिलांना पोषण आहाराचे महत्त्व सांगण्यात आले. सुदृढ बालकांना व बालिकेला प्रोत्साहन मिळावे, म्हणून त्यांनाही पोषक आहार देण्यात आला.
किशोरवयीन मुलींना स्वच्छतेबाबत जागरूकता करणारे टिप्स देण्यात आले व त्यांना आवश्यक स्वच्छतेसाठी सामग्री देण्यात आली.
कोरोना लॉकडाऊन काळातही आपले कार्य चोख बजावणाऱ्या अंगणवाडीसेविकांना इनरव्हील क्लबतर्फे सन्मानित करण्यात आले.
क्लब अध्यक्ष तृप्ती नागोरी यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी क्लब सेक्रेटरी रुचिता अग्रवाल, उपाध्यक्षा रितिका हेडा, सदस्या सिद्धी तिवारी, नीलिमा निकम, पल्लवी झोपे, पल्लवी सोनार उपस्थित होत्या. प्रकल्पाकरिता निशा मंडलेचा, श्वेता लड्डा, मुस्कान मोटवाणी, राखी भराडे, गीतिका दरगड, श्रुती लाहोटी, संजीवनी लाहोटी, ईशा मनवानी यांचे सहकार्य लाभले.
बेबीकिटचेही वाटप करण्यात आले. सीडीपीओ रेखा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका जयश्री जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी कंडारी येथील अंगणवाडीसेविका, मदतनीस यांनी परिश्रम घेतले.